Stock To Buy : 2025 हे वर्ष शेअर मार्केट साठी फारच आव्हानाचे राहले. गेल्यावर्षी अनेक कंपन्यांच्या शेअर्सने निगेटिव्ह रिटर्न दिलेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले.
मार्केटमधील चढ-उतार गुंतवणूकदारांसाठी फारच त्रासच राहिला आहे. पण अशा या चढउताराच्या काळात सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये काही शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशा करोडपती बनवले.

आज आपण अशाच एका स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.
One Point One Solutions असे या कंपनीचे नाव असून या कंपनीने मागील पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल दोन हजार टक्के रिटर्न दिले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे या शेअर्समध्ये अजूनही तेजी आहे आणि येत्या काळात हा स्टॉक आणखी तेजीत येऊ शकतो असं म्हटलं जाऊ लागलं आहे.
गुंतवणूकदारांना पुन्हा चांगले रिटर्न मिळणार
या कंपनीचे शेअर्स आज मंगळवारी दोन टक्क्यांनी वाढले आहेत. हा स्मॉल कॅप स्टॉक आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 54.70 रुपयांवर पोहोचला.
खरे तर कंपनीने बाजारातून पुन्हा एकदा मोठा निधी उभारण्याची योजना असल्याचे जाहीर केले आणि हे वृत्त समोर येता बरोबर या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली.
या वृत्तानंतर या शेअरच्या किमतीत अडीच टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कंपनीने निधी उभारण्याविषयाच्या विशेष ठरावाला मंजुरी मिळाली असल्याचे काल जाहीर केले.
यानंतर या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आलेत आणि येत्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे.
शेअर नाही कुबेरचा खजाना
मागील बारा महिने या कंपनीच्या शेअर्स साठी फारसे उत्साहवर्धक राहिलेले नाहीत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉक मध्ये फक्त तीन टक्क्यांची वाढ झाली तर गेल्या बारा महिन्यांच्या काळात हा स्टॉक सहा टक्क्यांनी वाढला.
मात्र मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 230% इतके रिटर्न मिळाले आहेत. तसेच पाच वर्षांचा विचार केला तर गुंतवणूकदारांना यातून दोन हजार टक्के एवढे जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत.













