कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अखेर पांढरं सोनं 8,000 रुपयांवर , रेट आणखी वाढणार ?

Published on -

Agro News : कापूस उत्पादकांसाठी खास बातमी आहे. कारण की आता कापसाचे रेट हळूहळू वाढत आहेत. खरंतर एक जानेवारीपासून कापूस आयात शुल्क पुन्हा एकदा लागू झाले आहेत.

केंद्रातील सरकारने वस्त्रोद्योगाला चालना मिळावी यासाठी कापूस आयातीसाठीचे 11 टक्के शुल्क माफ केले होते. यामुळे कापसाचे भाव गेल्या वर्षी दबावत राहिले.

विजयादशमीपासून राज्यातील बाजारांमध्ये कापसाची आवक सुरू झाली पण बाजार भाव चांगलेच दबावत राहिलेत. आयात शुल्क लागू नसल्याने मोठ्या प्रमाणात देशात कापसाची आयात होत होती.

मात्र आता आयात शुल्क पुन्हा एकदा लागू झाले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून एक जानेवारीपासून रेट मध्ये सुधारणा दिसून येत आहे. आज तर राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाचे रेट 8000 रुपयांपर्यंत पोहोचलेत.

कापसाचे सरासरी बाजार भाव देखील हमीभावाच्या आसपास पोहोचले आहेत आणि म्हणूनच उत्पादकांच्या माध्यमातून समाधान व्यक्त होत आहे. तसेच येत्या काळात यात आणखी वाढ होईल अशी भोळीभाबडी अपेक्षा देखील शेतकऱ्यांना आहे.

तज्ञांनी देखील कापूस दर वाढीसाठी सध्या पोषक स्थिती असल्याचे सांगितले आहे. आज कापसाची पंढरी म्हणून ख्यातनाम असणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा विक्रमी भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली.

मागील बारा – तेरा दिवसांमध्ये कापसाचे भाव एक हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. वास्तविक यावर्षी कापसाची विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे पण देशांतर्गत कापसाचे उत्पादन कमी झाले असल्याने आयात वाढत राहिली तरी देखील दरवाढीसाठी मजबूत आधार कायम राहण्याची शक्यता आहे.

31 डिसेंबर पर्यंत देशात जवळपास 32 लाख गाठी कापसाची आयात झाली. तसेच येत्या काळात आणखी वीस लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशाही स्थितीत खुल्या बाजारात कापसाचे रेट 500 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

यामुळे सीसीआय ने देखील कापूस खरेदीचे रेट 800 ते 1200 रुपयांपर्यंत वाढवल्याची माहिती समोर आली आहे. सीसीआयच्या या निर्णयाचा देखील कापुस बाजारभावावर परिणाम होत आहे. तसेच मागील सात दिवसांच्या काळात सरकीचे रेट 300 ते 400 रुपयांनी वाढले आहेत.

दरम्यान येत्या काळात यात आणखी तेजीची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस कापूस बाजारभावात अशीच तेजी राहू शकते. म्हणून पांढऱ्या सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe