पांढरं सोन पुन्हा जोमात ! 15 दिवसात कापसाच्या बाजारभावात झाली ‘इतकी’ वाढ

Published on -

Agro Market  : 2025 कापूस उत्पादकांसाठी चिंतेचे राहिले. पण हे वर्ष त्यांच्यासाठी फारच खार ठरत आहे. वर्षांच्या सुरवातीलाचं कापसाचे भाव वाढले आहेत.

1 जानेवारीपासून कापसाचे रेट सतत वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. फक्त 15 दिवसात कापसाचे भाव 900 रुपयांपर्यंत वाढलेत.

अकोटसारख्या बाजारात रेट 8 हजार रुपयांवर पोहचले आहेत. बाजारात पांढरं सोन अक्षरशः भाव खात आहे. दोन वर्षानंतर कॉटनचे भाव विक्रमी पातळीवर गेलेत.

पांढर सोन दबावत राहण्याचे कारण 

सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ केले होते. पण आता नव्या वर्षात हे शुल्क पुन्हा लागू झाले आहे. यांचा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळतोय.

आयात शुल्क माफिच्या आदेशाने बाजारात दबाव होता. पण आता शुल्क पुन्हा एकदा लागू झाल्याने देशांतर्गत कापूस बाजारातील दबाव थोडा कमी झाला आहे. 

सरकारच्या निर्णयाचा फायदा 

नव्या निर्णयामुळे आता परदेशी मालाची आवक कमी होत आहे. तसेच याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बाजारभाव तेजीत आहेत. आता आपण कापसाचे भाव कशा पद्धतीने वाढलेत त्याचा एक आढावा घेऊयात.

मागील पंधरा दिवस कापसासाठी ठरलेत खास 

तारीखभाव
30 डिसेंबर 6900 ते 7200
2 जानेवारी  7400 ते 7600
13 जानेवारी7600 ते 7900

सीसीआय खरेदी केंद्रावरील गर्दी झाली कमी

सरकारने कापूस हमीभावात खरेदी करण्यासाठी सीसीआय खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी या केंद्रांवर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी प्रचंड गर्दी होती.

खुल्या बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेकजण सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्री करताना आपल्याला पाहायला मिळालेत.

पण आता खुल्या बाजारातच कापसाचे भाव आठ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत आणि म्हणूनच सीसीआय खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

यामुळे सीसीआय खरेदी केंद्रावर देखील कापसाचे भाव वाढवण्यात आले आहेत. याचा सुद्धा सकारात्मक परिणाम खुल्या बाजारातील कापूस दरावर होतोय. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe