Business Loan : केंद्र – राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील वंचित अन गरजू घटकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब गरजूंना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
मोदी सरकारने कोरोना काळात अशीच एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 90 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी जास्त डॉक्युमेंट सुद्धा द्यावे लागत नाही.

नागरिकांना फक्त आधार कार्ड दाखवून या अंतर्गत 90 हजार रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. तुम्हाला जर छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या योजनेतून तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता.
फेरीवाल्यांसाठी सुरू झाली नवीन योजना
कोरोना काळात जे रस्त्यांवर व्यवसाय करायचे, जे फेरीवाले होते त्यांचे व्यवसाय अडचणीत आलेत. फळ फुल विक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच रस्त्याच्या कडेने छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला.
दरम्यान याच नागरिकांना पुन्हा एकदा उभारी मिळावी या अनुषंगाने केंद्रातील सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी शासनाने या योजनेची मुदत थेट 2030 पर्यंत वाढवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना नव्वद हजार रुपयांपर्यंतचे विनाहमी उपलब्ध करून दिले जाते.
कर्जाची मर्यादा वाढवली
या योजनेच्या सुरुवातीला नागरिकांना फक्त 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जात होते. पण आता शासनाने या योजनेतून 90 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र यातून एकाच टप्प्यात 90 हजार रुपये मिळत नाहीत.
सुरुवातीला या योजनेतून पात्र नागरिकांना 15000 रुपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जाची परतफेड झाली की मग पंचवीस हजार रुपये कर्ज मिळतं. दुसऱ्यांदा घेतलेल्या कर्जाची योग्य वेळी परतफेड केली की तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांचे कर्ज मिळते.
अशा तऱ्हेने 90 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभार्थ्यांना यूपीआय लिंक रुपी क्रेडिट कार्ड मिळते. डिजिटल पेमेंट वर कॅशबॅक चा लाभ सुद्धा दिला जातो. जर समजा वेळेवर कर्जाची परतफेड केली तर इंटरेस्ट सबसिडी पण मिळते.
या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन अर्ज करू शकता. तुम्हाला या योजनेसाठी डॉक्युमेंट म्हणून फक्त तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल. तरीही अधिकची माहिती जाणून घ्यायची असल्यास बँकेला एकदा अवश्य भेट द्या.












