Government Employee News : तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने मकर संक्रांतीची भेट म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना थेट दोन कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज नावाचे नवीन सॅलरी अकॉउंट सूरु झाले आहे.

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देत देशभरातील सार्वजनिक बँकांना याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून बँकांना खास कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सरकारने देशातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना हे नवे निर्देश जारी केले आहेत आणि या निर्देशाचे पालन झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी मकर संक्रांतीच्या दिवसापासून अर्थात 14 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असल्याची माहिती सुद्धा दिली आहे.
2047 पर्यंत सर्वांना विमा संरक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे आणि याच धोरणाचा एक भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन विमा संरक्षण धोरण राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश देण्यात आले.
दरम्यान आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा त्यांना नेमका काय लाभ मिळणार या निर्णयामुळे नेमके काय बदलणार याचा आढावा येथे घेणार आहोत.
कसे राहणार कंपोझिट सॅलरी अकाउंट
आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा आणि विमा संरक्षण सेवा वेगवेगळ्या ठिकाणी घ्याव्या लागत होत्या. पण आता नव्या सॅलरी अकाउंट मुळे या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळणार आहेत.
विशेष म्हणजे या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना चक्क दोन कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. हे अकाउंट केंद्रीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अब आणिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा डोळ्यापुढे ठेवून डिझाईन करण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातूनच सरकारी कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा, विमा सेवा तसेच सर्व प्रकारच्या कार्ड सुविधा एकाचं पॅकेज मधून मिळणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या बँकिंग सुविधा मिळणार
या योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट ओपन करता येईल. RTGS, NEFT, UPI आणि चेकबुक पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
होम लोनसह सर्व प्रकारचे कर्ज कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात उपलब्ध होईल. बँका कोणतही कर्ज मंजूर करताना प्रक्रिया शुल्क आकारतात,
पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना हे शुल्क कमी लागणार आहे. बँकेच्या लॉकर साठी जे शुल्क लागते ते शुल्क एकतर माफ केले जाईल किंवा कमी लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील बँकिंग फायदे उपलब्ध असतील.
मिळणार दोन कोटी रुपयांचा लाभ
या योजनेतून दोन कोटी रुपयांचा विमान अपघात विमा मिळेल. वैयक्तिक अपघात विमा दीड कोटी रुपयांपर्यंतचा राहील. कायमस्वरूपी अपंगत्व विमा मर्यादा दीड कोटी रुपयांची राहणार आहे. वीस लाख रुपयांच्या इनबिल्ड कव्हर सोबत टर्म लाइफ इन्शुरन्स उपलब्ध असेल.
स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी आरोग्य विमा दिला जाईल. या योजनेच्या माध्यमातून डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर वेगवेगळे लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या नव्या योजनेअंतर्गत कार्डधारकांना अनलिमिटेड व्यवहार करता येतील, यासाठी कोणतेच मेंटेनन्स शुल्क सुद्धा द्यावे लागणार नाही.
कार्ड वापरणाऱ्यांना रिवार्ड पॉईंट, कॅशबॅक तसेच विमानतळावर वेगवेगळ्या सुविधा मिळू शकतात. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना आपल आधीच सॅलरी अकाउंट या नव्या सॅलरी अकाउंट मध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे.












