Pm Kisan चा शेतकरी पती पत्नी दोघांनाही 2000 रुपयांचा लाभ मिळणार ? सरकारने दिली मोठी माहिती

Published on -

Pm Kisan Yojana : पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारची एक सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी योजना. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो.

दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 21 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

ही योजना देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. शेतीमध्ये लागणारा उत्पादन खर्च भागवता यावयासाठी ही योजना सुरू झाली असून या योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या योजनेचे लाभार्थी शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान 22 वा हप्ता जमा करणे आधी केंद्रातील सरकारकडून या योजनेचे नियम पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहेत. अनेकजण या योजनेचा एकाच कुटुंबातील दोन जणांना लाभ मिळणार का, पती आणि पत्नी दोघांनाही या योजनेतून दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार का?

असा सवाल विचारतात. याबाबत आता केंद्राने जाहीर केलेल्या नियमांमधून स्पष्टता आली आहे. सरकारने फार्मर आयडी असणे, केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

या नियमांचे उल्लंघन झाल्यास योजनेचा हप्ता थांबवला जाईल असे सरकारने यावेळी जाहीर केले.  सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळू शकतो. या योजनेचा एका शेतकरी कुटुंबाला लाभ दिला जातो.

शेतकरी कुटुंबात पती पत्नी आणि अल्पवयीन मुले यांचा समावेश असतो. म्हणजेच एकाच कुटुंबातील दोन लोकांना लाभ मिळणार नाही अर्थात पती आणि पत्नी दोघांना या योजनेचा एकाच वेळी लाभ मिळू शकत नाही.

एकतर पत्नीला लाभ मिळेल किंवा मग पतीला या योजनेतून लाभ मिळेल. जर समजा पती आणि पत्नी दोघांनीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्यातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे.

जर काही प्रकरणांमध्ये पती आणि पत्नी दोघांनी लाभ घेतला असेल तर अशावेळी एका व्यक्तीचा लाभ थांबवला जाईल आणि आधी दिलेली रक्कम सुद्धा परत घेतली जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News