आनंदाची बातमी ! हायवेवर प्रवास करताना गाडी खराब झाली किंवा पेट्रोल संपले तर आता जागेवर मिळणार मदत ! ‘या’ नंबरवर करा संपर्क

Published on -

Highway News : आपण एखाद्या हायवेवरून प्रवास करतोय, प्रवासाचा आनंद घेतोय आणि मध्येच आपली गाडी काही कारणास्तव बंद पडली तर…; साहजिकच अशा स्थितीत वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

बाहेर पिकनिकसाठी गेलेलो असलो किंवा अर्जंट कामानिमित्ताने बाहेर जायचे असेल आणि अशावेळी हायवेवर गाडी बंद पडली तर फारच चिडचिड होते.

मात्र आता तुम्ही हायवेवर प्रवास करत असताना तुमच्या गाडीचे पेट्रोल संपले असेल किंवा गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल आणि यामुळे तुमचा प्रवास थांबला असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही कारण की आता तुम्हाला थेट जागेवर मदत मिळणार आहे.

गाडीचे पेट्रोल-डिझेल संपलेले असेल तर तुम्हाला थेट इंधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जर गाडीत तांत्रिक बिघाड झाला असेल तर अशावेळी सुद्धा तुम्हाला तांत्रिक मदत उपलब्ध होणार आहे.

हो, अशी सुविधा सुरू झाली असून यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. हायवेवरून प्रवास करताना गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा पेट्रोल डिझेल संपलं म्हणून आता वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाहीये.

कारण की, आता एका फोन कॉलवर वाहनचालकांना अशा परीस्थितीत मदत मिळवता येणार आहे. यासाठी वाहनचालकांना 1033 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. पेट्रोल अभावी किंवा तांत्रिक कारणांमुळे गाडी बंद पडल्यास वाहनचालकांनी हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यानंतर नियंत्रण कक्ष लाईव्ह लोकेशन ट्रेस करते.

त्यानंतर मग सदर वाहन चालकाच्या जवळ असणाऱ्या पेट्रोल व्हॅन सोबत किंवा मग मदत पथकासोबत संपर्क साधला जातो आणि मदत पोहोचवली जाते. जर गाडीचे पेट्रोल डिझेल संपले असेल तर अशावेळी जागेवरच पाच लिटर पर्यंत इंधन उपलब्ध करून दिले जाते.

विशेष म्हणजे ही सुविधा पूर्णपणे निशुल्क असते आणि वाहनचालकांना फक्त इंधनाचा खर्च द्यावा लागतो. वाहनात जर तांत्रिक बिघाड असेल तर यांत्रिक सहकार्य केले जाते किंवा मग वाहन टोइंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

अपघात झाल्यास रुग्णवाहिका आणि पोलिसांना ताबडतोब संपर्क साधला जातो. वाहनचालकांना इंधनाची मदत हवी असल्यास ते 1033 हेल्पलाइन क्रमांकाव्यतिरिक्त 8577051000 आणि 7237999944 या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकतात.

अनेक इंधन कंपन्या वाहन चालकांना मागणीनुसार इंधन वितरित करतात. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केल्यानंतर साधारणता अर्ध्या तासाच्या आत संबंधितांना मदत पुरवली जाते असा दावा केला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News