Agro News: कापसाचे भाव अखेरकार आता आठ हजाराच्या पुढे गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा थोडेसे जास्त झाले आहेत.
खरे तर सरकारने कापूस आयातीसाठी लागू असणारे 11% शुल्क पुन्हा एकदा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील बाजारांमधील परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. मागील वर्षी कापूस आयातीसाठी कोणतेच शुल्क लागू नव्हते.

कापडं उद्योगाला चालना मिळावी या अनुषंगाने सरकारने कापूस आयातीसाठीचे 11 टक्के शुल्क 31 डिसेंबर पर्यंत माफ केले होते. त्याचा परिणाम म्हणून मागे कापसाला एवढा भाव मिळत नव्हता. राज्यातील बाजारांमध्ये कापूस हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात होता.
परिणामी सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. मात्र आता हे शुल्क लागू झाल्यानंतर आणि सरकीचे भाव वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाला चांगला भाव मिळतो.
शेतकऱ्यांना पुन्हा फटका !
अशातच, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी एक अपडेट समोर आली आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ होणार असा अंदाज समोर येत आहे.
कापूस उत्पादन आता थेट 310 लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. आधीच्या अंदाजापेक्षा यात 7.50 लाख गाठींची वाढ दिसून येते. एकट्या महाराष्ट्रातच तीन लाख गाठी उत्पादन वाढण्याचा अंदाज या नव्या अहवालातून समोर येत आहे.
CIA चा अंदाजानंतरची डेवलपमेंट
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून हा अंदाज देण्यात आला आहे. पीक व्यवस्थाप, कापूस पट्ट्यात अनुकूल हवामान या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्पादनात मोठी वाढ होणार असे सांगितले जाऊ लागले आहे.
गेल्या वेळी कापूस उत्पादन 312.40 लाख गाठी एवढे होते. पण यावेळी हे उत्पादन 317 लाख गाठी पर्यंत पोहोचणार आहे. दुसरीकडे कापसाची निर्यात यंदा मंदावणार असे बोलले जात आहे.
मागील वेळी 18 लाख गाठींची निर्यात करण्यात आली होती पण यावेळी यामध्ये देखील तीन लाख गाठींची कपात होण्याची शक्यता आहे. याच साऱ्या पार्श्वभूमीवर येत्या काळात कापसाचे भाव पडणार की काय अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.













