Breaking News : जमीन खरेदी-विक्री संदर्भात भारतात वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे कायदे आहेत. देशात असे काही राज्य आहेत जिथे बाहेरील राज्यातील लोकांना जमीन खरेदी करता येत नाही.
ईशान्येकडील बहुतांशी राज्यांमधील बाहेरील राज्यांच्या लोकांना जमीन खरेदी करण्यास मनाई आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात शेती योग्य जमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतो. गुजरात मध्ये पण असाच काहीसा नियम आहे.

दरम्यान आता आसाम राज्यात एक वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयावर आता मोठे वादंग उठण्याची पण शक्यता आहे. आसाम राज्य सरकारने आता मुस्लिमांना हिंदू लोकांकडून जमीन खरेदी करता येणार नाही असा कायदा तयार केला आहे.
आसाम राज्य मंत्रिमंडळने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. CM हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
आसाम राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
आसाम राज्यात आता हिंदू लोकांची जमीन मुस्लिमांना खरेदी करता येणार नाही. जर हिंदू लोकांची जमीन मुस्लिमांना खरेदी करायची असेल तर अशा प्रकरणात आता तेथे जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक राहणार आहे.
हिंदू लोकांकडून मुस्लिमांना जमीन खरेदी करण्यासाठी जिल्हा उपायुक्त किंवा जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळाली तरच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार आहे. शासनाने राज्यातील सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे.
आसाम मध्ये बांगलादेशी नागरिक येतात जमिनी खरेदी करतात इथे राहतात अशा काही घटना समोर आल्यात आणि या घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन तेथील सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयामुळे जमिनीच्या व्यवहारांवर प्रशासनाचे नियंत्रण वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. जाणकार सांगतात की या निर्णयामुळे भारतीय मुस्लिमांना कोणताच त्रास सहन करावा लागणार नाही फक्त जमीन खरेदी विक्रीची प्रक्रिया थोडी किचकट होण्याची शक्यता आहे.
पण आसाम सरकारने घेतलेला हा निर्णय नव्या राजकीय वादाला तोंड फोडणार आहे. यामुळे आता या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्षातील नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे राहील. तसेच भविष्यात हा निर्णय बंगाल, झारखंड अशा काही राज्यांमध्ये पण लागू केला जाणार का? हे पण पाहण्यासारखे राहणार आहे.













