शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांना टीईटी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट, वाचा सविस्तर

Published on -

TET News : देशभरातील शिक्षकांसाठी एक महत्वाचे अपडेट आहे. जस की आपणास माहितीच आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षीच्या शेवटी एक महत्त्वाचा निर्णय दिला. शिक्षकांना टीईटी सक्तीची करण्यात आली.

ज्या शिक्षकांनी टीईटीची परीक्षा दिलेली नाही त्यांना दोन वर्षांच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार असेही यातून स्पष्ट झाले.

दरम्यान आता टीईटी सक्तीच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काही शिक्षकांना टीईटी सक्तीचा निर्णय लागू राहणार नाही. म्हणजेच या आदेशातून त्यांना सूट मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या शिक्षकांना टीईटी सक्तीच्या निर्णयातून वगळले जाऊ शकते या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

हजारो शिक्षकांना मिळणार दिलासा  

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून टीईटी परीक्षामधून काही शिक्षकांना सूट दिली जाणार असून याकरिता राज्य शासनाकडून शिक्षकांबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.

13 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या महत्त्वाच्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा सक्ती मधून सूट देणे कामी आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून शिक्षकांच्या वयोगटाुसार माहिती मागविण्यात आली असल्याचे सांगितले गेले आहे. या आदेशात 2011 पूर्वी शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची व त्यानंतर रुजू झालेल्या शिक्षकांची स्वातंत्र माहिती मागविण्यात आले असल्याचे सांगितले गेले आहे.

यावरून ज्या शिक्षकांची नियुक्ती राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर झाली आहे अशा शिक्षकांना टीईटी सक्तीची राहणार असे म्हटले जात आहे.

पण ज्या शिक्षकांची नियुक्ती 2011 च्या आधी म्हणजेच राष्ट्रवाल हक्क शिक्षण कायदा लागू होण्याआधी झालेली असेल अशा शिक्षकांना टीईटी मधून कदाचित सूट मिळण्याची शक्यता आहे. नक्कीच या सदर शिक्षकांना टीईटी सक्तीच्या निर्णयातून सूट मिळाली तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News