Toll News : देशभरातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकार लवकरच टोल वसुली बाबत नवा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
महामार्गांवरून प्रवास करताना आता सर्वसामान्य वाहनचालकांचा वेळ वाचावा यासाठी सरकारच्या माध्यमातून टोल वसुलीबाबतच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या वर्षात टोल प्लाजा वरील टोल वसूल करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल मिळणार आहे. केंद्र सरकार आता टोल वसुलीची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन बनवणार आहे. आता वाहन चालकांना फक्त कॅशलेस पद्धतीने टोल भरता येणार आहे.
फास्टटॅग किंवा मग युपीआयच्या माध्यमातून वाहन चालकांना टोल भरता येणार आहे. नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर टोल प्लाजा वर कॅश घेतली जाणार नाही.
निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात
केंद्रातील सरकारकडून हा नवा निर्णय येत्या आर्थिक वर्षापासून लागू केला जाईल अशी शक्यता आहे. एक एप्रिल 2025 पासून हे नवे नियम लागू होणार असे बोलले जात आहे.
म्हणजे आता वाहनचालकांना यूपीआय (जसे की फोन पे, गुगल पे भीम यूपीआय अशा एप्लीकेशनच्या माध्यमातून) किंवा फास्टॅगद्वारेच टोल भरावा लागणार असा अंदाज आहे. यामुळे सर्व सामान्य वाहनचालकांचा खूप वेळ वाचणार आहे.
खरे तर टोल प्लाजा वरती अशी नाही पेमेंट करण्यासाठी वाहनचालकांना बराच वेळ टोल नाक्यावर अडकून राहावे लागते. यामुळे आता वाहनचालकांचा वेळ वाचावा यासाठी नवीन नियम लागू होणार आहेत. केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.
ते म्हणालेत की, यूपीआयवरुन टोल भरण्याची सुविधा सुरु आहे, त्याला चांगली पसंती मिळतं आहे. यामुळे आता सरकारने टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे बंद घालण्याचा निर्णय घेतलाय. हे नवे नियम 1 एप्रिलनंतर लागू होतील असे पण ते म्हटले आहेत. अर्थात अद्याप याच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर झालेली नाही. पण नव्या आर्थिक वर्षात हे नवीन नियम लागू होतील.













