Business Loan : सरकारकडून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत. नवयुवक उद्योजकांसाठी देखील सरकार नवनवीन योजना राबवते. सरकार नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत करते.
कोरोना काळापासून देशात कित्येक स्टार्टअप सुरू झालेत. तरीही अनेकजण असे आहेत ज्यांना पैशाची अडचण येते. भांडवलाभावी अनेकांना स्वतःचा बिजनेस करता येत नाही. या अनुषंगाने आता पीएम मुद्रा योजना सुरू झाली आहे. याद्वारे सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते.

कर्ज मर्यादा वाढवण्याची मोठी घोषणा
पीएम मुद्रा योजना काही आत्ताच सुरू झालेली योजना नाही. ती एक जुनी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आधी केंद्र सरकार फक्त दहा लाख रुपयांचे कर्ज देत होते.
पण आता वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्ज मर्यादा वीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम म्हणून यांनी संसदेत या निर्णयाची माहिती दिली होती.
खरंतर पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्ज पुरवठा केला जातो. आधी शिशु, तरुण, किशोर कॅटेगरीमधून यातून कर्ज दिले जात होते. पण आता यामध्ये तरुण प्लस ही नवीन श्रेणी ऍड झालीये. यातुन आता वीस लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
योजनेचे स्वरूप
यातून आता चार श्रेणीमध्ये कर्ज दिले जाते.
शिशु – पन्नास हजार रुपये
किशोर – 50 हजार ते पाच लाख रुपये
तरुण – पाच लाख रुपये ते दहा लाख रुपये
तरुण प्लस – दहा लाख रुपये ते वीस लाख रुपये
या योजनेच्या शिशु कर्जासाठी अर्ज केल्यास कोणतेही तारण द्यावे लागत नाही. या योजनेतुन साधारणता नऊ ते बारा टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होते. तुम्हाला योजनेच्या लाभासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन अर्ज करू शकता.













