5 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यावर ! महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार लाभ?

Published on -

DA Hike News : तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी बाबत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये 5% महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आली.

कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. यानुसार 2025 मध्ये जानेवारी महिन्यापासून दोन टक्के आणि जुलै महिन्यापासून तीन टक्के अशी पाच टक्के वाढ मंजूर करण्यात आली. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा दोनदा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 किंवा पाच टक्क्यांनी वाढू शकतो. तीन टक्के वाढ मंजूर झाली तर महागाई भत्ता 61 टक्के होईल आणि पाच टक्के वाढ मंजूर झाली तर 63 टक्के होईल.

दरम्यान याबाबतचा शासन निर्णय हा मार्च महिन्यामध्ये निघेल अशी आशा आहे. होळी सणाच्या आसपास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय होईल आणि ही वाढ जानेवारी 2026 पासून लागू राहणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 58% महागाई भत्ता मिळतो.

या धर्तीवर देशभरातील पाच राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि तेथे कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाला आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडीसा, हरियाणा या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाला आहे.

राजस्थानातील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग अंतर्गत 252 टक्के आणि पाचवा वेतन आयोग अंतर्गत 466% इतका महागाई भत्ता मिळतोय. त्याचवेळी एमपी मधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% करण्याचा निर्णय सरकारने अलीकडेच घेतला आहे.

महाराष्ट्रात मात्र मागील वर्षी फक्त एकदाच महागाई भत्ता वाढ मिळाली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणे प्रलंबित आहे.

खरंतर राज्यातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता मागील वर्षीच 58% करण्यात आला होता. पण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही 55% इतका आहे. मीडिया रिपोर्टनुसार या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

याचा जीआर येत्या काही दिवसांनी निघेल आणि प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्याच्या पगारांसोबत राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe