Pm Kisan Yojana : यावर्षी संसदेत अर्थसंकल्प एक – दोन दिवस आधीच सादर केला जाणार आहे. दरम्यान या अर्थसंकल्पाकडे देशातील सर्वच नागरिकांचे लक्ष लागून आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होतील असा अंदाज आहे.
दरम्यान अर्थसंकल्प सादर होण्याआधीच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरंतर अर्थसंकल्पात यावेळी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पी एम किसान अंतर्गत वार्षिक 6000 रुपये दिले जातात पण यामध्ये आता 4000 ची भरीव वाढ होईल असा अंदाज आहे. खरे तर गेल्या दोन वर्षांपासून जेव्हा आपण अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा या योजनेच्या रकमेत वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू होतात.
यंदाही तशीच स्थिती आहे यामुळे यावर्षी तरी या चर्चा खऱ्या ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि हे शेतकरी आता पुढील हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अर्थसंकल्पाच्या आधी पैसे मिळणार का
शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्ते मिळतात. चार महिन्यांनी एक हप्ता या पद्धतीने एका वर्षात तीन हप्ते मिळतात. मागील आता नोव्हेंबर 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.
यामुळे पुढील 22 वा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये जमा होईल असा अंदाज आहे. अर्थात अर्थसंकल्पाच्या आधी नाही तर अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर कदाचित या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकतो.
अर्थसंकल्प सुरू असताना किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झाल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान चा पुढील हप्ता मिळू शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.













