SBI Car Loan : नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास असेल. प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते ते म्हणजे आपल्या दारापुढे एक फोर व्हीलर उभी पाहिजे. स्वतःचे घर आणि चार चाकी गाडी हे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न आहे.
मात्र या महागाईच्या काळात रोखीने हे स्वप्न पूर्ण करणे कठीण होते. त्यामुळे अनेक जण घर तसेच गाडी खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय घेतात. अशा स्थितीत जर तुम्ही पण स्वतःची चार चाकी गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेणार असाल तर हा लेख तुमच्यासाठी कामाचा राहणार आहे.

आज आपण देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेतून दहा लाखांचे कार लोन घेण्यासाठी महिन्याचा पगार किती असायला हवा? याबाबत बँकेचे नियम काय सांगतात याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
SBI चे नियम काय सांगतात
2025 हे वर्ष मध्यमवर्गीयांसाठी खास राहिले. सरकारने चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या कार वरील जीएसटी 18% केला आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळत असून कार खरेदीला गती मिळाली आहे.
छोट्या गाड्यांवरील टॅक्स कमी झाला असल्याने याचा सर्वसामान्य मध्यमर्गीयांना मोठा फायदा मिळत आहे आणि अनेक जण आता नवीन गाडी घेत आहेत. दरम्यान तुम्ही हप्त्याने नवीन गाडी घेणार असाल तर एसबीआय तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
एसबीआय कडून तुम्हाला कमी व्याजदरात कार लोन मिळते. आता आपण एसबीआय कडून पाच वर्षांसाठी दहा लाखांचे कार लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार तसेच यासाठी तुमचा पगार किती हवा याची माहिती पाहणार आहोत.
किती पगार लागणार?
आरबीआयने मागील एका वर्षात रेपो रेटमध्ये 1.25 टक्क्यांची कपात केली आणि ही कोणत्याही एका वर्षात सर्वाधिक कपात ठरली. या निर्णयामुळे देशभरातील बँकांनी कर्जाचे व्याजदर घटवले. एसबीआय ने देखील कार लोनचे व्याजदर कमी केले.
ही सरकारी बँक सध्या आपल्या ग्राहकांना 8.7% व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देते. परंतु हा व्याजदर सुरुवातीचा आहे म्हणजेच ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना या व्याजदराचा लाभ मिळतो. एसबीआय कडून दहा लाखांचे कार लोन घ्यायचे असेल तर वार्षिक पगार तीन लाख रुपये पाहिजे.
हफ्त्याचे गणित कसे आहे?
एसबीआयकडून आजच्या व्याजदरानुसार 5 वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले तर 20,613 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. एसबीआय आपल्या ग्राहकांना त्यांच्या पगाराच्या 48 पट एवढे कर्ज देते.
अर्थात जर तुमचा पगार महिन्याचा 25 हजार रुपये असेल तर तुम्हाला बारा लाख रुपयांपर्यंत सुद्धा कर्ज मिळू शकत. परंतु तज्ञ नेहमीच ग्राहकांना ईएमआय पगाराच्या 50% असायला हवा असा सल्ला देतात.













