Car Loan News : या वर्षात तुम्हाला स्वतःची नवीन गाडी घ्यायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आपला एक टुमदार घर असावं आणि घरापुढे एक चार चाकी गाडी असावी असं स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं असतंच.
या स्वप्नासाठी अनेकदा आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. दरम्यान गेल्या वर्षी सरकारने गाड्यांवरील टॅक्स कमी केला असल्याने वाहन विक्रीचा आलेख सातत्याने वाढत आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी शासनाचा हा निर्णय दिलासादायक ठरत आहे.

अशा स्थितीत जर तुम्हीही टॅक्स कमी झाला आहे म्हणून गाडी घेणार असाल आणि यासाठी तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला देशातील प्रमुख सरकारी बँकांच्या कार लोनच्या व्याजदराची माहिती असणे आवश्यक आहे.
दरम्यान आज आपण देशातील अशा चार बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या की आपल्या ग्राहकांना स्वस्तात कार लोन ऑफर करत आहेत.
या बँका देतात सर्वात कमी व्याजदरात कार लोन
कॅनरा बँक : ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना नवीन कार खरेदी करण्यासाठी 90% पर्यंत कर्ज उपलब्ध करते. विशेष म्हणजे प्री पेमेंट वर ही बँक कोणताच दंड वसूल करत नाही. आरबीआय ने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर या बँकेने कार लोनचे पण व्याजदर कमी केले आहेत. आज तुम्ही जर कार लोन घेणार असाल तर ही बँक 7.95% व्याजदरात तुम्हाला कर्ज ऑफर करेल. हे बँकेचे सुरुवातीचे व्याजदर आहे.
Indian Overseas Bank : ही सरकारी बँक 7.60% व्याज दरात ग्राहकांना कार लोन देत आहे. ही बँक सात वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी कार लोन ऑफर करते. कमी व्याजदरात कर्ज घ्यायचे असेल तर या बँकेचा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट राहील.
Bank of India : या बँकेचे कार लोन सुद्धा 7.60% व्याजदरात सुरू होते. हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे, या व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिबिल चांगला आहे त्यांनाच मिळतो.
बँकेकडून तुम्ही कार लोन घेतलं तर तुम्हाला एकूण कर्जाच्या 0.25 टक्के इतके प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार आहे. प्रोसेसिंग शुल्क साधारणता पंचवीसशे रुपयांपासून सुरू होते आणि दहा हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. या कर्जाची स्पेशल गोष्ट अशी की इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास प्रोसेसिंग शुल्क भरावे लागत नाही.
Union Bank Of India : ही बँक सध्या स्थितीला 7.50% व्याजदरात आपल्या ग्राहकांना कार लोन उपलब्ध करून देत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांकडून प्रक्रिया शुल्क म्हणून 1000 रुपये आणि त्यावर जीएसटी वसूल करते.













