Share Market News : आठवडा शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी खास ठरणार आहे. खरे तर आज दोन कंपन्यांनी एक्स डिव्हीडंड ट्रेड केले.
बँक ऑफ महाराष्ट्र ने आपल्या गुंतवणूकदारांना एक रुपये प्रति शेअर लाभावून जाहीर केला होता आणि यासाठीची रेकॉर्ड डेट आजची ठरवण्यात आली होती.

एनएलसी इंडिया लिमिटेडने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 3.60 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता आणि यासाठीची रेकॉर्ड तारीख देखील आजचीच होती.
दरम्यान या आठवड्यात अजूनही काही कंपन्या एक्स डिव्हीडंड ट्रेड करणार आहेत. या आठवड्यात एकूण नऊ कंपन्या लाभांश देणार होत्या.
त्यातील दोन कंपन्यांची रेकॉर्ड तारीख 20 जानेवारी होती. आता आपण बाकीच्या 7 कंपन्यांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की या आठवड्यात लाभांश जाहीर करणार आहेत.
या कंपन्या देणार Dividend
सूरज लिमिटेड : या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1.50 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठीची रेकॉर्ड 23 जानेवारी 2026 ठरवण्यात आली आहे.
डीसीएम श्रीराम लिमिटेड : या कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. अद्याप लाभांशाची रक्कम ठरवण्यात आलेली नाही पण यासाठी रेकॉर्ड तारीख 23 जानेवारी जाहीर झाली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 0.20 रुपये लाभांश देणार आहे. यासाठी कंपनीने 23 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
DBCORP : या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दोन रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला आहे आणि यासाठी 22 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख जाहीर करण्यात आली असे.
एंजल वन लिमिटेड : ही कंपनी प्रति शेअर 23 रुपयांचा लाभांश देणार आहे. यासाठी ची रेकॉर्ड तारीख 21 जानेवारी आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अॅसेट मॅनेजमेंट : ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 14.85 रुपयांचा अंतरीम लाभांश देणार असून यासाठीची रेकॉर्ड तारीख 21 जानेवारी ठरवण्यात आली आहे.













