Soybean Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी राज्यातील त्या शेतकऱ्यांसाठी खास ठरणार आहे ज्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे.
या पिकाला शेतकरी बांधव पिवळं सोन म्हणून ओळखतात. पण गेल्या तीन – साडेतीन वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे.

पण यंदा पिवळं सोन शेतकऱ्यांना मालामाल बनवू शकत आणि याचे संकेत आता बाजारातून समोर येत आहेत. मागील तीन साडेतीन वर्षांपासून दबावात असणारा सोयाबीन बाजार आता तेजीच्या दिशेने वाटचाल करत असून बाजार भावाने आज मोठी जग घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसात सोयाबीन चा रेट आणखी कडाडणार असल्याचा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
बाजार अभ्यासकांनी पुढील काही दिवस सोयाबीन बाजारासाठी सकारात्मक राहतील असे ठाम मत व्यक्त केले आहे. यावर्षी राज्यातील बहुतांशी सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि याचा उत्पादनाला मोठा फटका बसलाय.
मराठवाड्यातील नांदेडमध्ये देखील अशीच स्थिती होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः वाया गेले असून जे काही शिल्लक राहिले त्यालाही सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे आता भाव वाढत असला तरी देखील शेतकऱ्यांमध्ये फारसे समाधान नसल्याचे दिसते.
पण तरीही ज्या शेतकऱ्यांकडे थोडाफार सोयाबीन शिल्लक आहे त्यांना या दरवाढीचा नक्कीच दिलासा मिळणार आहे. जाणकार लोक सांगतात की सध्या सोयाबीनला 5,100 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळतोय आणि येत्या काळात हा भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
मात्र या दरवाढीचा बहुतांशी शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाहीये. कारण असे की राज्यातील जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांनी आधीच पैशांच्या गरजेमुळे आधीच आपला सोयाबीन विकून टाकला आहे. जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांना पैशांची त्यावेळी अडचण नव्हती, त्यांच्याकडेच आता सोयाबीन शिल्लक आहे आणि अशा शेतकऱ्यांनाच आता या दरवाढीचा लाभ मिळणार आहे.
अभ्यासक सांगताहेत की साडेतीन वर्षांपूर्वी सोयाबीनचा बाजार 5000 च्या पुढे होते आणि आता पुन्हा एकदा सोयाबीनला खुल्या बाजारात 5000 च्या पुढे दर मिळतोय.
दरम्यान अभ्यासाकांनी पुढील आठ-दहा दिवस बाजारात अशीच तेजी कायम राहील असा अंदाज दिला आहे. एवढेच नाही तर काही अभ्यासकांनी सोयाबीनचा भाव साडेपाच हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.













