Share Market Breaking : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी लाभांशाच्या शोधात असणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे.
खरंतर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच लाभांश वितरित करणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात. अशा कंपन्यांमधून कमाई करण्याची संधी गुंतवणूकदार कधीच सोडत नाही.

दरम्यान तुम्ही पण अशाच कंपन्यांमधून कमाई करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने पुन्हा एकदा लाभांश जाहीर केला आहे.
यावेळी कंपनीने प्रति शेअर 22 रुपयांचा लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे पुन्हा एकदा कंपनीचे शेअर फोकस मध्ये आले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे कंपनी 33 व्यांदा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट देणार आहे. त्यामुळे कंपनीच्या या घोषणेची चर्चा होणे स्वाभाविक होते आणि त्यानुसार या घोषणाची चर्चा सुरू आहे आणि या कंपनीचे स्टॉक पुन्हा आता फोकस मध्ये आले आहेत.
या महिन्यात आहे रेकॉर्ड डेट
पर्सिस्टंट सिस्टम्सने लाभांशासाठीची रेकॉर्ड तारीख सुद्धा जाहीर केली आहे. कंपनी यावेळी पाच रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या शेअरनुसार प्रति शेअर 22 रुपये लाभांश देणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने यासाठी 27 जानेवारी ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स देखील जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 2015 मध्ये या कंपनीने एका शेअरसाठी एक शेअर बोनस दिला होता.
शेअर्सची कामगिरी कशी आहे?
पर्सिस्टंट सिस्टम्सचे शेअर्स लाभांशाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर या कंपनीचे शेअर दोन टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स बीएसईवर सहा हजार 306 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
मात्र मागील 30 दिवसांच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे. बारा महिन्यांच्या काळात यात गुंतवणूक करणाऱ्यांना 3.53% इतके रिटर्न मिळाले आहेत.
पण मागील तीन वर्षांच्या काळात यात गुंतवणूक करणाऱ्यांना 483% इतके जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत. पाच वर्षांचा विचार केला असता यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 1444% एवढे रिटर्न मिळालेत अशी माहिती समोर आली आहे.













