मुहूर्त सापडला ; नमो शेतकरीचा हफ्ता ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! वाचा सविस्तर

Published on -

Namo Shetkari Yojana : राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी लाडकी बहीण, नमो शेतकरी अशा अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्यात.

त्यांचा अडीच वर्षांचा काळ हा विशेष खास ठरलाय. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या योजना वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच पद्धतीने पुढे सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान मागील सरकारच्या काळात सुरू झालेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. 

केंद्राच्या योजनेला राज्याची जोड! 

नमो शेतकरी ही योजना केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी पीएम किसानचे लाभार्थी पात्र ठरतात. केंद्र सरकार पीएम किसानच्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करते आणि राज्य सरकार नमो शेतकरीच्या माध्यमातून 6000 रुपयांची मदत करते.

म्हणजेच राज्यातील पीएम किसान च्या लाभार्थ्यांना केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे एकूण 12,000 रुपये मिळत आहेत. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात पीएम किसानचा 21 वा हफ्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय. 

पीएम किसानच्या लाभार्थ्यांना लवकरच पैसे मिळणार

आता या योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच बावीसवा हफ्ता मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पीएम किसानच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण गेल्या दोन अडीच महिन्यांपासून नमो शेतकरी चा हप्ता प्रलंबित आहे.

नमोच्या शेतकऱ्यांना सात हप्ते मिळाले आहेत आणि त्यांना आठव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. खरे तर नमोचा हप्ता नोव्हेंबर मध्येच मिळणे अपेक्षित होते पण काही कारणास्तव हप्ता पुढे ढकलला गेला आहे. 

नमोचा पुढील हप्ता या मुहूर्तावर जमा होईल

दरम्यान पुढील महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी फडणवीस सरकार लवकरच नमोचा आठवा हप्ता वितरित करण्याची घोषणा करण्यात असल्याचा दावा होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार नमोचा हप्ता जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या आधी म्हणजेच 5 फेब्रुवारी च्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

नमोच्या आठव्या हफ्त्याचे दोन हजार रुपये झेडपीच्या मतदानाआधी शेतकऱ्यांना दिले जातील. पण अद्याप फडणवीस सरकारकडून किंवा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe