रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, 12 स्टेशनंवर थांबा मंजूर

Published on -

Breaking News : तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

मुंबईवरून आणखी एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वे कडून घेण्यात आला असून या निर्णयाचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रवासी देखील या निर्णयामुळे आनंद व्यक्त करत आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूरसाहेब नांदेड अशी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय झाला आहे. ही विशेष गाडी २३ जानेवारीपासून सुरू होणार असून एकूण चार फेऱ्या करणार आहे. या निर्णयामुळे मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या गाडीचा लाभ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक रोड आणि मनमाड येथील प्रवाशांनाही होणार आहे.

गाडी क्रमांक ०१०४१ ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूरसाहेब नांदेड विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे.

ही गाडी प्रवास करत दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०० वाजता हुजूरसाहेब नांदेड येथे पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०१०४२ ही हुजूरसाहेब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेड येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल होईल.

या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा असे महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई, नाशिक, मराठवाडा आणि नांदेड परिसरातील प्रवाशांना थेट आणि सोयीस्कर रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे. सण-उत्सव, लग्नसराई तसेच वैद्यकीय व शैक्षणिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

डब्यांच्या रचनेबाबत बोलायचे झाल्यास, या गाडीत एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, आठ शयनयान श्रेणी, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य तृतीय श्रेणी असे एकूण विविध प्रकारचे डबे असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी तसेच वातानुकूलित प्रवास पसंत करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण होतील.

या विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला http://www.enquiry.indianrail.gov.in भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. या विशेष सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असेही रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News