Best Picnic Spot : पिकनिकचा किंवा छोट्या सुट्टीचा प्लॅन करताना अनेकांना एकच प्रश्न सतावत असतो तो म्हणजे कमी खर्चात जास्त मज्जा कुठे मिळेल ? महागड हिल स्टेशन किंवा परदेशी टूरपेक्षा भारतातील काही पर्यटनस्थळे अशी आहेत,
जिथे कमी बजेटमध्येही फुल टू मज्जा, अध्यात्म, इतिहास आणि निसर्गाचा सुरेख संगम अनुभवता येतो. दरम्यान आज आपण देवदर्शनाचा प्लॅन असणाऱ्या लोकांसाठी खास माहिती घेऊन आलो आहोत.

खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये राजस्थानतील खाटू श्याम बाबाचे रील प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकजण श्रीक्षेत्र खाटू नगरीत खाटू श्याम बाबांचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत.
तुम्ही पण खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर आज आम्ही तुम्हाला खाटू श्याम बाबा व्यतिरिक्त आणखी कोणत्या मंदिरांची दर्शन घेता येऊ शकतात याची माहिती सांगणार आहोत.
सावरिया सेठ (Sanwaria Seth) : भगवान कृष्णाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले सावरिया सेठ हे भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. येथे दर्शनासाठी मोठा खर्च लागत नाही. साधी निवासव्यवस्था, स्वस्त भोजन आणि शांत वातावरण यामुळे मनाला वेगळीच शांती मिळते.
जयपूर : ‘पिंक सिटी’ म्हणून ओळखले जाणारे जयपूर हे इतिहासप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी परफेक्ट ठिकाण आहे. हवा महाल, सिटी पॅलेस, आमेर किल्ला पाहताना राजस्थानची राजेशाही झलक अनुभवता येते. बजेट हॉटेल्स आणि स्थानिक खाद्यपदार्थ जयपूरला किफायतशीर बनवतात.
चितोडगड : राजपूत शौर्याचा साक्षीदार असलेला चितोडगड किल्ला इतिहासात रस असणाऱ्यांसाठी खास आहे. भव्य किल्ला, विजय स्तंभ आणि पद्मिनी राजवाडा पाहताना भूतकाळ जिवंत झाल्यासारखा वाटतो.
खाटू श्याम : श्रद्धा आणि भक्तीची अनुभूती देणारे खाटू श्याम मंदिर उत्तर भारतातील प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असली तरी खर्च मात्र अगदी मर्यादित असतो.
सलासार बालाजी : हनुमान भक्तांसाठी सलासार बालाजी हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. खाटू श्यामसोबत सलासारची यात्रा अनेकजण एकत्र करतात, त्यामुळे प्रवासही सोयीस्कर आणि स्वस्त ठरतो.
उदयपूर : ‘लेक सिटी’ म्हणून ओळखले जाणारे उदयपूर हे रोमँटिक आणि शांत पर्यटनस्थळ आहे. पिछोला तलाव, सिटी पॅलेस आणि सूर्यास्ताची दृश्ये मन मोहून टाकतात. येथेही बजेटमध्ये राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
जोधपूर : ब्लू सिटी जोधपूरमध्ये मेहरानगड किल्ला, घड्याळ टॉवर आणि स्थानिक बाजारपेठ प्रसिद्ध आहेत. कमी खर्चात राजस्थानी संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर जोधपूर उत्तम पर्याय आहे.
थोडक्यात, कमी बजेट, जास्त अनुभव आणि अविस्मरणीय आठवणी यासाठी ही 7 पर्यटनस्थळे पिकनिकसाठी नक्कीच भेट देण्यासारखी आहेत.













