Stock To Buy : तुम्हीही येत्या काळात नवीन शेअर्स खरेदी करण्याच्या विचारात आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. 2025 मध्ये शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
अनेक शेअर्सने गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिलेत आणि यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या वर्षाची सुरुवात देखील चढउतारानेच झालेली आहे. मार्केटमध्ये अजूनही अस्थिरता दिसून येत आहे.

भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये ही अस्थिरता पाहायला मिळत असून सध्या स्थितीला शेअर बाजारात कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम जोरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी योग्य शेअर्स निवडणे महत्त्वाचे ठरत आहे. बाजारातील चढ-उतार, देशांतर्गत मागणीतील वाढ, पायाभूत सुविधांवरील खर्च आणि जागतिक धोरणांतील बदल यांचा विचार करता ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी पाच महत्त्वाचे शेअर्स सुचवले आहेत. या शेअर्समध्ये पोलाद, सिमेंट, विमा, स्ट्रक्चरल स्टील आणि ब्रोकिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न
टाटा स्टील हा यादीतील पहिला शेअर असून, यासाठी २२० रुपयांचा टार्गेट प्राईस देण्यात आला आहे. भारतातील पोलादाची वाढती मागणी आणि आयातीवरील निर्बंधांमुळे स्टीलच्या किमतींना आधार मिळत आहे. याशिवाय, कंपनीच्या युरोपमधील व्यवसायात सुधारणा होत असून २०२६ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत ब्रिटनमधील कामकाज तोटा विरहित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे टाटा स्टील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक मानला जात आहे.
दुसरा महत्त्वाचा शेअर म्हणजे कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स, ज्याचा टार्गेट प्राईस १८० रुपये आहे. कॅनरा बँक आणि एचएसबीसीसारख्या मजबूत भागीदारांच्या पाठिंब्यामुळे कंपनीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. बँकेच्या विशाल ग्राहकवर्गापर्यंत विमा उत्पादने पोहोचवण्याची क्षमता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभाव यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर फायदेशीर ठरू शकतो.
एपीएल अपोलो ट्युब्स या कंपनीचा टार्गेट प्राईस २,२६० रुपये ठेवण्यात आला आहे. स्ट्रक्चरल स्टील ट्युब्समध्ये ५५% बाजार हिस्सा असलेल्या या कंपनीने आता सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या सोलर माउंटिंग स्ट्रक्चर्सवर भर दिला आहे. २०३० पर्यंत उत्पादन क्षमता १० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची योजना कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ घडवू शकते.
सिमेंट क्षेत्रातील दिग्गज अल्ट्राटेक सिमेंटसाठी १३,६५० रुपयांचा टार्गेट प्राईस देण्यात आला आहे. कंपनीचा मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला क्षमता विस्तार, वाढता बाजार हिस्सा आणि मजबूत आर्थिक कामगिरी यामुळे हा शेअर गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरू शकतो.
यादीतील पाचवा शेअर म्हणजे एंजल वन, ज्याचा टार्गेट प्राईस ३,४०० रुपये आहे. ब्रोकिंगव्यतिरिक्त कमॉडिटी, म्युच्युअल फंड आणि कर्ज वितरणात विस्तार केल्यामुळे कंपनीचा महसूल आणि नफा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेतही हा शेअर दीर्घकालीन संधी देऊ शकतो.













