Stock To Buy : जानेवारी महिना समाप्तेकडे वळू लागला आहे आणि अवघ्या देशाचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागले आहे. शेअर मार्केट गुंतवणूकदार देखील संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
मागील वर्ष मार्केट साठी निराशा जनक राहिले आहे. गेल्या वर्षी अनेक कंपन्यांच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न मिळालेत. मात्र यंदा गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगला परतावा मिळेल अशी आशा आहे.

दरम्यान अर्थसंकल्पानंतर काही सेक्टर्समधील कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. यावर्षी सरकारचे डिफेन्स सेक्टरकडे विशेष लक्ष राहणार असल्याने या सेक्टरमधील कंपन्यांवर गुंतवणूकदार विश्वास दाखवू शकतात.
दरम्यान आज आपण येत्या काळात गुंतवणूकदारांना 24 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता असणाऱ्या चार शेअरबाबत माहिती पाहणार आहोत. शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काही निवडक शेअर्समध्ये चांगली संधी असल्याचे संकेत दिग्गज ब्रोकरेज कंपन्यांकडून मिळत आहेत.
केमिकल्स, ऑटोमोबाईल, टायर आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षांत स्थिर वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा फायदा या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांना होऊ शकतो. ईटी नाऊसह इतर विश्वासार्ह आर्थिक माध्यमांतील अहवालांच्या आधारे प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनी काही शेअर्सवर सकारात्मक भूमिका घेतली आहे.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल (TMCV) : ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल (CV) विभागाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने या विभागावर ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम ठेवले असले तरी ४१७ रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्या सुमारे ३३७ रुपयांवर व्यवहार करणाऱ्या या शेअरमध्ये जवळपास २३ टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. भारतातील ट्रक आणि बस बाजारात टाटा मोटर्सचा दबदबा असून, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढीचा थेट फायदा कंपनीला मिळू शकतो.
सिएट (CEAT) : टायर उद्योगातही गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी दिसत आहे. आरपीजी समूहाची प्रमुख कंपनी सिएट (CEAT) बाबत मोतीलाल ओसवाल यांनी सकारात्मक मत व्यक्त केले आहे. सध्या ३,७१२ रुपयांच्या आसपास असलेल्या या शेअरसाठी ४,५७९ रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वाहन उद्योगातील मागणी वाढ, निर्यातीत सुधारणा आणि उत्पादन क्षमतेत वाढ यामुळे सिएटच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओबेरॉय रियल्टी : रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रीमियम कंपनी ओबेरॉय रियल्टीवरही ब्रोकरेज संस्थांचा विश्वास कायम आहे. नुवामा ब्रोकरेजने या शेअरला पसंती देत १,७१९ रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे. सध्या १,५२४ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर सुमारे १२ टक्क्यांचा परतावा देऊ शकतो. मुंबईतील उच्च दर्जाचे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प ही कंपनीची ओळख आहे.
एसआरएफ : केमिकल्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एसआरएफ (SRF) बाबतही नुवामा ब्रोकरेजने ‘बाय’ सल्ला दिला आहे. सध्याच्या २,८७३ रुपयांच्या किमतीवरून हा शेअर ३,५८४ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, म्हणजेच जवळपास २४ टक्क्यांची संभाव्य वाढ अपेक्षित आहे. फ्लोरोकेमिकल्स आणि स्पेशालिटी केमिकल्समधील मजबूत व्यवसायामुळे एसआरएफ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरू शकते. एकूणच, बाजारातील चढ-उतार लक्षात घेता तज्ज्ञांनी सुचवलेले हे शेअर्स दीर्घकालीन दृष्टीने गुंतवणूकदारांसाठी संधीचे दार उघडू शकतात.












