Canara बँकेची एफडी योजना बनवणार मालामाल ! १००००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार ४०००० रुपयांचे व्याज

Published on -

Canara Bank FD Scheme : मागील वर्ष गुंतवणूकदारांसाठी थोडेसे फायद्याचे तर थोडेसे चिंतेचे राहिले. ज्यांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली होती अशा गुंतवणूकदारांना गेल्या वर्षी चांगले रिटर्न मिळालेत.

मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या वर्षी अपेक्षित रिटर्न मिळालेले नाहीत. महत्वाची बाब म्हणजे आजही शेअर मार्केटमध्ये तशीच स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत.

सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणारी बहुतांशी लोक बँकांच्या एफडी योजनांमध्ये पैसा लावत आहे. शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याने अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि खात्रीशीर पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.

अशा परिस्थितीत कॅनरा बँकेची मुदतठेव (Fixed Deposit) योजना गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरत आहे. खरंतर आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर अनेकांनी बँकांच्या एफडी योजनांकडे पाठ फिरवली कारण की बँकांनी फिक्स डिपॉझिट चे व्याजदर बऱ्यापैकी कमी केले आहे.

पण कॅनरा बँकेचा पर्याय आजही फायद्याचा ठरू शकतो कारण की ही बँक काही कालावधीच्या एफडीवर चांगले व्याज देते. दरम्यान बँकेने सुरू केलेली ५५५ दिवसांची ‘स्पेशल एफडी’ योजना सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

कॅनरा बँक ही देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, सामान्य नागरिकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या विश्वासाने ग्राहक या बँकेकडे पाहतात. बँकेने आपल्या या विशेष एफडी योजनेवर ७ टक्क्यांहून अधिक व्याजदर जाहीर केल्यामुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.

अस्थिर बाजारात जिथे नफ्याची खात्री नसते, तिथे ही योजना स्थिर परताव्याची हमी देते. ५५५ दिवसांच्या या स्पेशल एफडी योजनेत सामान्य नागरिकांना वार्षिक ६.५० टक्के व्याजदर मिळतो.

तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ७.०० टक्के असून, ८० वर्षांवरील अति ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ७.१० टक्के व्याजदराचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा पर्याय शोधणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना विशेष फायदेशीर ठरत आहे.

जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या योजनेत १ लाख रुपये गुंतवले, तर ५५५ दिवसांनंतर त्याला एकूण सुमारे १,३९,७५० रुपये मिळू शकतात. म्हणजेच केवळ व्याजापोटी जवळपास ३९,७५० रुपयांचा फायदा होतो.

सामान्य नागरिकांसाठीही ही रक्कम कमी नाही. १ लाखांच्या गुंतवणुकीवर त्यांना सुमारे १,३६,३५४ रुपये मिळतात, ज्यामध्ये ३६,३५४ रुपये व्याजाचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये मोठी कपात केल्यानंतर अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले होते.

मात्र, कॅनरा बँकेने तुलनेने आकर्षक दर कायम ठेवत गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक, निश्चित परतावा आणि बँकेवरील विश्वास या तिन्ही गोष्टी एकत्र मिळवायच्या असतील, तर कॅनरा बँकेची ५५५ दिवसांची स्पेशल एफडी योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe