शेतकरी कर्जमाफीची अधिकृत तारीख जाहीर ! किती लाखांची कर्जमाफी होणार? राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Published on -

Shetkari Karjmafi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट आता लवकरच सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

खरे तर महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आमचे सरकार पुन्हा राज्यात आले तर आम्ही शेतकऱ्यांना लागलीच कर्जमाफीचा लाभ देऊ अशी घोषणा केली होती.

मात्र आता महायुतीला सरकार स्थापित करून बरेच दिवस झाले आहेत पण तरीही कर्जमाफी बाबत ठोस निर्णय काही झालेला नाही. मात्र शेतकरी कर्जमाफी बाबत महायुती मधील नेते वेळोवेळी शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत.

दरम्यान आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीची अधिकृत तारीख यावेळी जाहीर केले आहे सोबतच यावेळी शेतकऱ्यांना किती लाखांची कर्जमाफी मिळणार याबाबतही संकेत दिलेले आहेत.

शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर सरकारकडून ठोस घोषणा करण्यात आली असून, ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार गंभीर असून, या संदर्भात आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल.”

कर्जमाफीसाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन केली असून, या समितीचा सविस्तर अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील आणि जून महिना संपण्याच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला होता. सातत्याने होणारे निसर्गाचे लहरीपण, वाढता उत्पादन खर्च, बाजारात मिळणारे अपुरे दर आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू तसेच इतर शेतकरी नेत्यांनी आक्रमक आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला होता.

या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या अधिकृत घोषणेमुळे त्या आश्वासनाला प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कर्जमाफीसाठी पात्रतेचे निकष, कर्जाची मर्यादा आणि अंमलबजावणीची पद्धत याबाबत लवकरच सविस्तर माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News