स्टॉक म्हणायचं की कुबेरचा खजाना ! 1 लाखाचे झालेत 10000000 रुपये

Published on -

Multibagger Stock : शेअर बाजारात दीर्घकाळ संयम ठेवून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी थंगमायिल ज्वेलरी हा शेअर खऱ्या अर्थाने कुबेरचा खजाना ठरला आहे. कंपनीवर विश्वास ठेवत ज्यांनी आपली गुंतवणूक कायम ठेवली, त्यांना अक्षरशः लॉटरी लागली आहे. गेल्या 15 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देत मल्टिबॅगर स्टॉक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

थंगमायिल ज्वेलर्सचा शेअर 19 फेब्रुवारी 2010 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी हा शेअर अवघ्या 70 रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे 1428 शेअर्स मिळाले होते. त्यानंतर जुलै 2023 मध्ये कंपनीने 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. त्यामुळे त्या गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या वाढून 2856 झाली.

बुधवारी, 21 जानेवारी 2026 रोजी थंगमायिल ज्वेलरीचा शेअर उसळून 3892.55 रुपयांवर बंद झाला. परिणामी, 2856 शेअर्सची एकूण किंमत तब्बल 1.1 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या परताव्यात कंपनीने वेळोवेळी दिलेला लाभांश गृहित धरलेला नाही. म्हणजेच प्रत्यक्ष फायदा याहून अधिक आहे.

कंपनीच्या आर्थिक कामगिरीकडे पाहिल्यास, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत थंगमायिल ज्वेलरीचा नफा दुपटीपेक्षा अधिक वाढला आहे. डिसेंबर 2025 तिमाहीत कंपनीने 105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, तर मागील वर्षी याच कालावधीत हा नफा 48 कोटी रुपये होता. महसुलातही मोठी झेप घेत कंपनीने 2406 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 172.2 कोटी रुपये इतका राहिला, जो मागील वर्षी 83.3 कोटी रुपये होता.

शेअरच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 105 टक्क्यांनी वाढला आहे. जुलै 2025 मध्ये 1900.25 रुपये असलेला शेअर जानेवारी 2026 मध्ये 3892.55 रुपयांवर पोहोचला. एका वर्षात तब्बल 126 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4138.15 रुपये, तर नीचांक 1526.45 रुपये आहे.

एकूणच, थंगमायिल ज्वेलरी हा शेअर म्हणजे गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणारा कुबेरचा खजाना ठरला असून, योग्य वेळी केलेली गुंतवणूक कशी करोडोंचा पल्ला गाठू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News