सव्वा लाखाच्या फोनवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा डिस्काउंट ! गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल रिपब्लिक डे सेल मध्ये स्वस्तात खरेदीची संधी

Published on -

Google Pixel 10 Pro XL : नवा प्रीमियम फोन घेणार आहात का? अहो मग तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. खरंतर सबंध देशभरात सध्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळत आहे. जेव्हा केव्हा राष्ट्रीय सण येतात म्हणजेच 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण येतात तेव्हा देशात एक वेगळेच वातावरण तयार होत.

यावर्षी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सबंध देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. गावागावांमध्ये देशभक्तीचा मोठा जागर पाहायला मिळतोय. शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्लीत देखील आणि आपल्या मुंबईत देखील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रशासन ॲक्शन मोडवर आहे.

दरम्यान या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शॉपिंग साइटवर मोठा डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आला आहे. ॲमेझॉनचा बहुप्रतिक्षित ग्रेट रिपब्लिक डे सेल २०२६ अखेर सुरू झाला असून, या सेलमध्ये स्मार्टफोनप्रेमींसाठी अनेक आकर्षक ऑफर्स पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे, गुगलचा सर्वात लेटेस्ट आणि प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीत लॉन्च झालेल्या या फोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट मिळत असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल भारतात तब्बल १ लाख २४ हजार ९९९ रुपये किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, ॲमेझॉनच्या रिपब्लिक डे सेलमध्ये हा फोन थेट १ लाख १० हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

म्हणजेच, या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत सुमारे १४ हजार ९ रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. याशिवाय, एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावर ग्राहकांना १००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच, जुना फोन एक्स्चेंज केल्यास आणखी जास्त बचत करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.

फीचर्सबाबत बोलायचे झाले तर, गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल केवळ किंमतीमुळेच नव्हे तर दमदार स्पेसिफिकेशन्समुळेही चर्चेत आहे. या फोनमध्ये ६.८ इंचाचा मोठा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, स्मूथ आणि प्रीमियम व्ह्यूइंग अनुभव देतो. फोटोग्राफीसाठी हा फोन खास मानला जात आहे.

यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि ४८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ४२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरीच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. यात ५२००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती ४५ वॅट फास्ट चार्जिंग आणि २५ वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. एकूणच, रिपब्लिक डे सेलमध्ये मिळणाऱ्या या आकर्षक ऑफर्समुळे गुगल पिक्सेल १० प्रो एक्सएल खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News