Maharashtra Teachers : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 बाबत मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली असून, यासंदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रलंबित निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला असून पगार व अनुदान वितरणास गती मिळणार आहे.
वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) वर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्याचा विषय राज्य शासनाच्या विचाराधीन होता.

आता या संदर्भात स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पीत करण्यात आलेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, नगरपालिका शाळा, शिक्षण मंडळांचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी, माध्यमिक शाळांची तपासणी व्यवस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने, शिक्षक प्रशिक्षण योजना, माध्यमिक शिक्षण विभाग, मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा, तसेच अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या सहाय्याचा समावेश आहे.
याशिवाय क्रीडा व युवक सेवा, सचिवालय सामाजिक सेवा, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित विविध लेखाशीर्षांखालील निधीही नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवून वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे निधी वितरणातील प्रशासकीय अडथळे दूर होऊन संबंधित विभागांना वेळेत आर्थिक तरतूद उपलब्ध होणार आहे.
या निर्णयाचा थेट फायदा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व महाविद्यालयांना होणार असून, जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारीत वेळेत मिळण्याची शक्यता बळावली आहे.
त्यामुळे अनेक दिवसांपासून पगाराबाबत असलेली अनिश्चितता दूर होऊन शिक्षण क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, शिक्षण व्यवस्थेला आर्थिक स्थैर्य देणारा हा GR महत्त्वाचा मानला जात आहे.













