Vivo V70 सीरीज भारतात लवकरच होणार लॉन्च; फीचर्स, किंमत आणि लाँचिंगची माहिती लीक

Published on -

Vivo V70 Smartphone : टेक कंपनी Vivo भारतात लवकरच त्यांच्या नवीन स्मार्टफोन सिरीज Vivo V70 लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या या नवीन सिरीजमध्ये Vivo V70 आणि Vivo V70 Elite हे दोन डिव्हाईस समाविष्ट असणार आहेत.

या स्मार्टफोन्सची माहिती अलीकडेच IMDA आणि BIS सारख्या सर्टिफिकेशन वेबसाईट्सवर दिसली असून, सोशल मीडियावर या फोन्सची डिझाईन देखील व्हायरल झाली आहे. लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोन्सची किंमत आणि फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे.

अलीकडील रिपोर्टनुसार, Vivo V70 सीरीज फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होऊ शकते. ही सिरीज मिडरेंज सेगमेंट मध्ये येणार असून, किंमत अंदाजे ₹55,000 पर्यंत असू शकते. स्टँडर्ड मॉडेल Vivo V70 पॅशन रेड आणि लेमन येलो कलरमध्ये येईल, तर V70 Elite मॉडेल ब्लॅक शेडसह या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Vivo V70 सीरीजच्या दोन्ही फोन्समध्ये एकसारखी वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. या फोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि पंच-होल सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे.

डिस्प्ले 6.59 इंच FHD+ AMOLED असेल. प्रोसेसरच्या बाबतीत स्टँडर्ड मॉडेलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जेन 3, तर Elite मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जन 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

कॅमेर्‍याच्या बाबतीत, दोन्ही फोन्समध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात येईल.

बॅटरीच्या बाबतीत, स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6320mAh आणि Elite मॉडेलमध्ये 6500mAh बॅटरी मिळेल, तसेच दोन्ही फोन्स IP68 रेटेड असून 55W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करतील.

Vivo V70 सीरीज भारतातील मिडरेंज स्मार्टफोन प्रेमींमध्ये खूप उत्सुकता निर्माण करत आहे. या फोन्सचे डिझाईन, रंग आणि फीचर्स पाहता, कंपनीने ग्राहकांसाठी नवीनतम तंत्रज्ञान आणि आकर्षक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच लाँचिंग नंतर याबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

या स्मार्टफोन्सची भारतीय बाजारात येणारी किंमत आणि फीचर्स पाहता, Vivo V70 सीरीज मिडरेंज सेगमेंटमध्ये स्पर्धात्मक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe