IPO News : प्रजासत्ताक दिनानंतर सुरू होणारा आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे येत्या रविवारी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामुळे धोरणात्मक निर्णय, करसवलती, भांडवली खर्च आणि विविध क्षेत्रांना मिळणाऱ्या प्रोत्साहनाबाबत अपेक्षा वाढल्या असून त्याचा थेट परिणाम बाजारातील हालचालींवर दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर SME (लघु व मध्यम उद्योग) विभागातील आयपीओंना चांगलीच गती मिळताना दिसत आहे.
या आठवड्यात SME क्षेत्रातील तब्बल 5 नवे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. Kasturi Metal Composite हा आयपीओ 27 ते 29 जानेवारीदरम्यान खुला राहणार असून कंपनी 17.61 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये शेअरचा प्राइस बँड 61 ते 64 रुपये असून लॉट साइज 2000 शेअर्सची आहे. 3 फेब्रुवारीला BSE SME वर लिस्टिंग अपेक्षित आहे.

Kanishk Aluminium India IPO 28 ते 30 जानेवारीदरम्यान खुला राहणार असून 29.20 कोटी रुपयांचा हा इश्यू 73 रुपयांच्या दराने येणार आहे. लॉट साइज 1600 शेअर्सची असून 4 फेब्रुवारीला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे.
CKK Retail Mart IPO 30 जानेवारीला खुला होऊन 3 फेब्रुवारीला बंद होईल. 88.02 कोटी रुपयांच्या या इश्यूचा प्राइस बँड 155 ते 163 रुपये असून लॉट साइज 800 शेअर्सची आहे.
याची NSE SME वर 6 फेब्रुवारीला लिस्टिंग अपेक्षित आहे. Msafe Equipments आणि Accretion Nutraveda हे दोन्ही आयपीओ 28 ते 30 जानेवारीदरम्यान खुले राहणार असून अनुक्रमे 66.42 कोटी आणि 24.77 कोटी रुपये उभारले जाणार आहेत.
दरम्यान, आधीपासून सुरू असलेल्या Hannah Joseph Hospital आणि Shayona Engineering या आयपीओंमध्ये गुंतवणुकीची अजूनही संधी उपलब्ध आहे. या दोन्ही आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळत असून 30 जानेवारीला त्यांची लिस्टिंग होणार आहे.
याशिवाय, या आठवड्यात Shadowfax Technologies कंपनीचे शेअर्स 28 जानेवारीला BSE आणि NSE मेनबोर्डवर लिस्ट होणार आहेत. तसेच Digilogic Systems, KRM Ayurveda, Hannah Joseph Hospital आणि Shayona Engineering या SME कंपन्यांच्या लिस्टिंगकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर येणारा हा आठवडा IPO बाजारासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













