Baba Vanga Gold Price Prediction :१९९६ मध्ये निधन झाल्यानंतरही आपल्या भविष्यवाण्यांमुळे जगभर चर्चेत राहिलेल्या बाबा वेंगा यांची सोन्याच्या दराबाबतची भाकीतं सध्या खरी ठरताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला असून सामान्य माणसासाठी सोने खरेदी करणे जवळपास अशक्य झाले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढती अस्थिरता, बँकिंग क्षेत्रातील संकट आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल झपाट्याने वाढत आहे.

बाबा वेंगा यांनी २०२६ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येईल, पारंपरिक बँकिंग प्रणालीला फटका बसेल आणि लोक सोने-चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांकडे वळतील, अशी भविष्यवाणी केली होती.
सध्याची परिस्थिती पाहता ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरत असल्याचे दिसून येते. अनेक देशांमध्ये बँकिंग क्षेत्रातील अस्थिरता, बाजारातील तरलतेची कमतरता आणि आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होत आहे.
गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या दरात तब्बल तिपटीने वाढ झाली आहे. सध्या एक ग्रॅम सोन्यासाठी सुमारे १४,८४५ रुपये मोजावे लागत आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५० हजार रुपयांच्या पुढे गेला होता, तर वर्षअखेरीस तो ५२,६७० रुपये होता.
२०२३ मध्ये हा दर ६५,३३० रुपयांपर्यंत पोहोचला. २०२४ च्या अखेरीस सोन्याचा दर ७७,९१३ रुपये झाला आणि गेल्या वर्षाच्या अखेरीस तो थेट एक लाखाचा टप्पा ओलांडत १,३०,००० रुपयांवर पोहोचला. २०२६ च्या सुरुवातीलाच सोन्याचे दर दीड लाखांच्या पुढे गेले आहेत.
अमेरिकेच्या कर धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्था अधिक अस्थिर झाली असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील रस कमी झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढतील की कमी होतील, हे आता केंद्रीय अर्थसंकल्पावर अवलंबून आहे. आयात शुल्क किंवा GST दरांमध्ये कपात झाल्यास स्थानिक बाजारात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र सध्यातरी सोन्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहणार असल्याचे चित्र आहे.













