Samsung Galaxy Z Flip 7 Olympic Edition सादर; मिलानो कोर्टिना विंटर ऑलिंपिक्स 2026 साठी खास स्मार्टफोन

Published on -

Samsung Galaxy Z Flip 7 : साऊथ कोरियाची टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवीन Samsung Galaxy Z Flip 7 Olympic Edition अधिकृतपणे सादर केला आहे. मंगळवारी कंपनीने या खास एडिशनची घोषणा केली असून, हा फोल्डेबल स्मार्टफोन मिलानो कोर्टिना विंटर ऑलिंपिक्स आणि पॅरालंपिक्स 2026 साठी विशेषतः डिझाइन करण्यात आला आहे.

येत्या 6 फेब्रुवारी 2026 पासून हे हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालंपिक स्पर्धा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सॅमसंगने हा लिमिटेड आणि एक्सक्लूसिव स्मार्टफोन एडीशन तयार केला आहे.

सॅमसंगने जाहीर केले आहे की, हा स्मार्टफोन सुमारे 90 देशांमधील 3,800 ऑलिंपियन आणि पॅरालिंपियनना भेट स्वरूपात दिला जाणार आहे. Galaxy Z Flip 7 Olympic Edition च्या रियर पॅनलवर Samsung आणि Olympics चे अधिकृत लोगो देण्यात आले आहेत. यासोबतच खास निळ्या रंगातील डिझाईन हे या फोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

या स्मार्टफोनमध्ये खेळाडूंकरिता काही एक्सक्लूसिव फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 100GB डेटा असलेले 5G eSIM, एक Galaxy Athlete Card आणि आधीपासूनच इंस्टॉल करण्यात आलेले फिटनेस ट्रॅकिंग अ‍ॅप्स यांचा समावेश आहे.

या अ‍ॅप्सच्या मदतीने खेळाडू ट्रेनिंग आणि वर्कआउट दरम्यान आपले वाइटल्स, फिटनेस आणि परफॉर्मन्स सहजपणे ट्रॅक करू शकणार आहेत.

याशिवाय, ऑलिंपिक बातम्या, स्पर्धांचे वेळापत्रक आणि अधिकृत अपडेट्ससाठी Athlete365 हे प्लॅटफॉर्म Galaxy AI Now Brief मध्ये एकत्रित करण्यात आले आहे.

तसेच या स्पेशल एडिशनमध्ये Olympic Games App, IOC Hotline आणि PinQuest यांसारखे अ‍ॅप्सही उपलब्ध असतील, ज्यामुळे खेळाडूंना गेम्स व्हिलेजमधील विविध इंटरॅक्टिव अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होता येणार आहे.

टेक्निकल स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, Galaxy Z Flip 7 Olympic Edition हे रेगुलर मॉडेलप्रमाणेच आहे. यात 6.9-इंच Full HD+ Dynamic AMOLED 2X फोल्डेबल डिस्प्ले आणि 4.1-इंच Super AMOLED कवर स्क्रीन देण्यात आली आहे.

भारतात जुलै 2025 मध्ये लाँच झालेल्या रेगुलर Galaxy Z Flip 7 ची किंमत 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसाठी 1,09,999 रुपये होती. ऑलिंपिक एडिशन विक्रीसाठी उपलब्ध नसून, तो फक्त खेळाडूंकरिता खास ठेवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe