एअरटेल ग्राहकांसाठी मोठी डिजिटल भेट! 4,000 रुपये किमतीचे Adobe Express Premium वर्षभर मोफत

Published on -

Airtel News : भारती एअरटेलने आपल्या तब्बल ३६ कोटी भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची डिजिटल भेट जाहीर केली आहे. एअरटेल आणि अडोबी यांच्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक भागीदारी झाली असून, या कराराअंतर्गत एअरटेलचे मोबाईल, वाय-फाय आणि डीटीएच सेवा वापरणारे सर्व ग्राहक Adobe Express Premium अ‍ॅपचे वर्षभर मोफत सबस्क्रिप्शन वापरू शकणार आहेत. या अ‍ॅपची मूळ वार्षिक किंमत सुमारे 4,000 रुपये आहे.

Adobe Express Premium हे अत्याधुनिक आणि वापरण्यास सोपे डिझाइन अ‍ॅप असून, याच्या मदतीने कोणताही डिझायनिंगचा अनुभव नसलेला सामान्य वापरकर्ता देखील प्रोफेशनल दर्जाचा कंटेंट तयार करू शकतो. सोशल मीडिया पोस्ट्स, जाहिराती, बॅनर्स, व्हिडिओ, शुभेच्छापत्रे, लग्नपत्रिका किंवा WhatsApp स्टेटस तयार करणे आता अधिक सोपे आणि जलद होणार आहे.

ही सुविधा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना फक्त Airtel Thanks अ‍ॅपवर लॉग-इन करावे लागेल. विशेष म्हणजे, हे सबस्क्रिप्शन सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची आवश्यकता नाही. काही सोप्या स्टेप्समध्ये ग्राहक Adobe Express Premium वापरण्यास सुरुवात करू शकतात.

Adobe Express Premium मध्ये हजारो प्रोफेशनल डिझाइन टेम्पलेट्स उपलब्ध असून, ही टेम्पलेट्स भारतीय सण-उत्सव, स्थानिक व्यवसाय, लग्न समारंभ आणि मार्केटिंगच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत.

यामध्ये बॅकग्राउंड रिमूव्हल, AI द्वारे इमेज जनरेशन, एका क्लिकवर व्हिडिओ एडिटिंग, 30,000 हून अधिक प्रोफेशनल फॉन्ट्स, 100GB क्लाउड स्टोरेज, प्रीमियम स्टॉक इमेजेस, ऑटो कॅप्शन आणि इन्स्टंट रिझाईजसारख्या प्रगत सुविधा मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे, तयार केलेल्या कंटेंटवर कोणताही वॉटरमार्क नसेल.

Adobe Express हे अ‍ॅप आता इंग्रजीसोबत हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषांमध्येही उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक भाषांमध्ये कंटेंट तयार करणे अधिक सोयीचे होणार आहे. या भागीदारीमुळे एअरटेल ग्राहकांना जनरेटिव्ह AI तंत्रज्ञानाचा थेट फायदा मिळणार असून, डिजिटल कामाचा वेग, दर्जा आणि सर्जनशीलता निश्चितच वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe