Redmi Note 15 Pro आणि Note 15 Pro Plus भारतात लाँच; 200MP कॅमेरा, दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्ससह वाढली किंमत

Published on -

Redmi Smartphone : रेडमीने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली लोकप्रिय Note सिरीज पुढे नेत Redmi Note 15 Pro आणि Redmi Note 15 Pro Plus हे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. काही काळापूर्वी Redmi Note 15 सादर केल्यानंतर आता कंपनीने प्रो आणि प्रो प्लस मॉडेल्स बाजारात आणले असून, यामध्ये आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत अनेक महत्त्वाचे अपग्रेड्स देण्यात आले आहेत. किंमत थोडी वाढलेली असली तरी फीचर्स पाहता हे फोन प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण करणार आहेत.

दोन्ही डिव्हाइसेसमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 6,000mAh पेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी आणि मोठा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे स्मार्टफोन Amazon, mi.com तसेच अधिकृत रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असून बँक ऑफर्ससह खरेदी करता येणार आहेत.

Redmi Note 15 Pro Plus : स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 15 Pro Plus मध्ये 6.83-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision आणि HDR10+ सपोर्टसह येतो. डिस्प्लेला Gorilla Glass Victus 2 चे संरक्षण देण्यात आले आहे. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 4 चिपसेट देण्यात आला असून, 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.

फोनमध्ये 6,500mAh बॅटरी असून ती 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, मागील बाजूला 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स आहे, तर समोर 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय Bluetooth 5.4, NFC, IR ब्लास्टर आणि IP66, IP68, IP69 व IP69K रेटिंग्स ही या फोनची खास वैशिष्ट्ये आहेत.

Redmi Note 15 Pro : स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 15 Pro मध्येही 6.83-इंचाचा AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या फोनला MediaTek Dimensity 7400-Ultra प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे.

यात 6,580mAh बॅटरी असून 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. कॅमेरा सेटअप प्रो प्लससारखाच असून, 200MP प्रायमरी कॅमेरा (OIS सह) आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

Redmi Note 15 Pro Plus ची किंमत ₹37,999 पासून ₹43,999 पर्यंत आहे, तर Redmi Note 15 Pro ची किंमत ₹29,999 ते ₹31,999 दरम्यान आहे.

दोन्ही फोनवर ₹3,000 पर्यंत बँक सूट उपलब्ध असून, प्री-बुकिंग करणाऱ्यांना विशेष ऑफर्सचाही लाभ मिळणार आहे. Redmi Note 15 Pro 4 फेब्रुवारी 2026 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe