Income Tax Department : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागात (Income Tax Department) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण ९७ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. विशेष म्हणजे १० वी, १२ वी तसेच सुशिक्षित उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

या भरती प्रक्रियेत टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि स्टेनोग्राफर ग्रेड-२ अशा विविध पदांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक ४७ पदे टॅक्स असिस्टंटसाठी असून ३८ पदे मल्टी टास्किंग स्टाफसाठी ठेवण्यात आली आहेत.
तसेच स्टेनोग्राफर ग्रेड-२ ची १२ पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
पात्रतेबाबत सांगायचे झाल्यास, टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवार किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच हिंदी किंवा इंग्रजी टायपिंग व शॉर्टहँडचे चांगले ज्ञान असणे अपेक्षित आहे. इतर पदांसाठीही केंद्र सरकारच्या नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता लागू राहणार आहे.
निवड प्रक्रिया ही मुख्यतः कौशल्य चाचणी, ट्रेड टेस्ट आणि कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या कौशल्यांवर भर देणे गरजेचे आहे.
वेतनाबाबत बोलायचे झाल्यास, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुमारे ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये प्रतिमाह वेतन मिळू शकते. कर निरीक्षकाचा पगार ३५,४०० रुपये ते १,१२,४०० रुपये दरम्यान आहे.
टॅक्स असिस्टंट व स्टेनोग्राफर पदांसाठी २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये इतके मासिक वेतन देण्यात येते, तर मल्टी टास्किंग स्टाफचा पगार १८,००० रुपये ते ५६,९०० रुपये इतका आहे. याशिवाय डीए, एचआरए आणि इतर भत्ते केंद्र सरकारच्या नियमांनुसार मिळणार आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindia.gov.in ला भेट द्यावी. भरतीची सविस्तर माहिती वाचून ऑनलाइन अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करून त्याची प्रत जतन करून ठेवावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ असल्याने इच्छुकांनी विलंब न करता लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













