iPhone Air Price : Apple चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच झालेल्या iPhone Air च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. लाँचवेळी तब्बल 1,19,900 रुपये किंमत असलेला हा प्रीमियम आयफोन आता हजारो रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या विशेष सेलमध्ये iPhone Air वर आकर्षक सूट, बँक डिस्काऊंट आणि एक्स्चेंज ऑफरचा लाभ मिळत आहे.
फ्लिपकार्टवर iPhone Air सध्या 99,900 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच थेट 20,000 रुपयांची बंपर कपात करण्यात आली आहे. याशिवाय निवडक बँक कार्डवर 4,000 रुपयांपर्यंतचा बँक डिस्काऊंट मिळत आहे.

काही युजर्सना अतिरिक्त 1,000 रुपयांचा डिस्काऊंटही मिळू शकतो. या सर्व ऑफर्सचा फायदा घेतल्यास iPhone Air तब्बल 25,000 रुपये स्वस्तात घरी आणता येणार आहे. हा फ्लिपकार्ट सेल 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
फिचर्सबाबत बोलायचं झालं तर iPhone Air हा Apple चा आतापर्यंतचा सर्वात स्लीम आयफोन मानला जातो. हा फोन केवळ 5.6mm जाड असून, यामध्ये 80% टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आला आहे.
फोनमध्ये 6.5 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला असून, तो 120Hz हाय रिफ्रेश रेट आणि 3000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन eSIM-ओन्ली असून USB Type-C वायर्ड चार्जिंगसह येतो.
परफॉर्मन्ससाठी iPhone Air मध्ये 3nm टेक्नोलॉजीवर आधारित A19 Pro Bionic चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये 6-कोअर CPU, 6-कोअर GPU आणि 16-कोअर न्यूरल इंजिन आहे. तसेच AI साठी डेडिकेटेड N1 चिप आणि Apple Intelligence सपोर्ट देण्यात आला आहे.
कॅमेरा विभागात मागील बाजूस 48MP कॅमेरा असून Sensor Shift OIS फिचर मिळते. सेल्फीसाठी 18MP चा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी कॅपेसिटी जाहीर करण्यात आलेली नसली तरी Apple चा दावा आहे की फोन सिंगल चार्जमध्ये संपूर्ण दिवस चालतो. यामध्ये 27 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
एकूणच, प्रीमियम डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि मोठ्या सूटमुळे iPhone Air खरेदीसाठी हा काळ उत्तम मानला जात आहे.













