Astrology News : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, वैभव, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. तर राहू हा मायावी आणि अचानक बदल घडवणारा ग्रह समजला जातो. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करत असल्याने त्याचा परिणाम सर्व राशींवर चांगल्या-वाईट स्वरूपात होत असतो.
एखाद्या व्यक्तीवर राहूची शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती, यश आणि धनलाभ होतो, तर अशुभ दृष्टीमुळे अडचणी वाढू शकतात.

सध्या राहू कुंभ राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे राशी परिवर्तन रात्री ०१ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे.
त्यामुळे कुंभ राशीत आधीपासून उपस्थित असलेल्या राहूसोबत शुक्राची युती निर्माण होईल. शुक्र-राहू युतीला ज्योतिषात विशेष महत्त्व दिले जाते. ही युती काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी ही युती अतिशय शुभ ठरेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. मनातील इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि वैवाहिक जीवन सुखमय राहील. नव्या संधी स्वीकारण्यासाठी हा काळ उत्तम ठरेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची साथ लाभेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. घरात शुभ कार्ये पार पडू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि शत्रू निष्प्रभ ठरतील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदी बातम्या घेऊन येणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. अविवाहितांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र-राहू युती विशेष लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील. आकस्मिक धनलाभ, नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, फेब्रुवारी महिना या राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे.













