खाजगी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्यांना EPFO EPS अंतर्गत किती पेन्शन मिळेल?

Published on -

EPFO News : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता हा कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निश्चित पेन्शन व्यवस्था नसल्यामुळे वृद्धापकाळात उत्पन्नाचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) कर्मचारी पेन्शन योजना (EPS) ही खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार ठरते.

EPFO अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा PF कपात केली जाते. यातील काही हिस्सा EPS योजनेसाठी राखीव ठेवला जातो. याच योगदानाच्या आधारे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळते. मात्र EPS पेन्शनचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतात.

पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्याने किमान 10 वर्षांची पेन्शनपात्र सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच पूर्ण पेन्शनसाठी कर्मचाऱ्याचे वय 58 वर्षे असणे गरजेचे आहे. यापूर्वी पेन्शन घेतल्यास रकमेवर कपात केली जाते.

पेन्शन कशी मोजली जाते?

EPFO कडून EPS पेन्शन मोजण्यासाठी एक सोपे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.

(पगार × एकूण सेवा वर्षे) ÷ 70

हे सूत्र वापरून मासिक पेन्शनची रक्कम काढली जाते. येथे पगार म्हणजे मूळ वेतन आणि महागाई भत्ता (DA) यांचा एकत्रित आकडा. मात्र EPFO नियमांनुसार पेन्शनसाठी कमाल वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच तुमचा प्रत्यक्ष पगार कितीही जास्त असला तरी पेन्शनची गणना 15,000 रुपयांवरच होईल.

2026 मध्ये निवृत्त झाल्यास किती पेन्शन?

समजा किशोर नावाचा कर्मचारी 2026 मध्ये निवृत्त होत आहे आणि त्याची एकूण EPS योगदान कालावधी 50 वर्षे आहे. EPFO नियमांनुसार कमाल वेतन मर्यादा 15,000 रुपये असल्याने किशोरचे पेन्शन खालीलप्रमाणे मोजले जाईल.

15,000 × 50 ÷ 70 = सुमारे 10,714 रुपये

म्हणजेच किशोरला निवृत्तीनंतर दरमहा अंदाजे 10,714 रुपये पेन्शन मिळेल. मात्र जर किशोरने 58 वर्षांपूर्वी, म्हणजेच 50 व्या वर्षीच पेन्शन घेण्यास सुरुवात केली, तर त्याला मोठा तोटा सहन करावा लागेल. नियमानुसार 58 वर्षांपूर्वी पेन्शन घेतल्यास प्रत्येक वर्षासाठी 4 टक्के पेन्शन कपात केली जाते.

त्यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी EPS योजनेची माहिती समजून घेऊन निवृत्तीचा योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe