व्हॅलेंटाईन डे निमित्त Apple India ची मोठी भेट; iPhone, MacBook, iPad वर आकर्षक कॅशबॅक ऑफर्स जाहीर

Published on -

Apple India Offers : तरुणाईचा सर्वात आवडता दिवस असणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना Apple India ने आपल्या ग्राहकांसाठी खास फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर केल्या आहेत. Apple कडून अधिकृत भारतीय वेबसाइटवरून व्हॅलेंटाईन डे सेलची घोषणा करण्यात आली असून,

या सेलमध्ये iPhone 17 सीरिजपासून ते MacBook, iPad, AirPods आणि Apple Watch पर्यंत अनेक लोकप्रिय प्रॉडक्ट्सवर आकर्षक डील्स देण्यात येत आहेत.

Apple यावेळी थेट किमतीत कपात करण्याऐवजी बँक सपोर्टेड कॅशबॅक आणि खास ऑफर्स देत आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करतानाच मोठा फायदा मिळत आहे.

विशेष म्हणजे ICICI Bank, Axis Bank आणि American Express यांसारख्या प्रमुख बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर त्वरित कॅशबॅक उपलब्ध आहे. चेकआउट दरम्यानच ग्राहकांना अंतिम डिस्काउंटेड किंमत दिसणार आहे.

या व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये MacBook Air वर तब्बल 10 हजार रुपयांपर्यंतचा त्वरित कॅशबॅक दिला जात आहे. यामुळे 13-इंच MacBook Air ची किंमत आता 89,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

या लॅपटॉपची मूळ किंमत सुमारे 99 हजार रुपये होती. विद्यार्थी, प्रोफेशनल्स आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी ही डील विशेष आकर्षक मानली जात आहे.

याशिवाय Apple ने MacBook Pro लाइनअपवरही सूट जाहीर केली आहे. 14-इंच MacBook Pro ची सुरुवातीची किंमत 1,69,900 रुपये होती, मात्र ऑफर कालावधीत तो 1,59,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

तसेच M4 चिपसेटसह येणारा 16-इंच MacBook Pro आता 2,39,900 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे, जो त्याच्या मूळ किमतीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे.

या व्यतिरिक्त iPhone 17 सीरिज, iPads, AirPods आणि Apple Watch वरही बँक ऑफर्सच्या माध्यमातून चांगला कॅशबॅक दिला जात आहे.

त्यामुळे जर तुम्ही या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या खास व्यक्तीसाठी एक प्रीमियम आणि उपयुक्त गिफ्ट देण्याचा विचार करत असाल आणि बजेटची अडचण नसेल, तर Apple India चा हा व्हॅलेंटाईन डे सेल नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News