सोनं-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; 2026 साठी बाबा वांगांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

Published on -

Baba Vanga Predictions : सध्या देशासह जागतिक बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी विक्रमी उच्चांक, तर कधी अचानक घसरण–या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

अशा पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवेत्ता बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याआधीही जगातील अनेक मोठ्या घडामोडींविषयी केलेली त्यांची काही भाकिते खरी ठरल्याचा दावा केला जातो.

बाबा वांगा यांनी 2026 साठी केलेल्या भाकितांमध्ये जागतिक आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या मते, भविष्यात जगाला मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा तुटवडा जाणवेल.

कागदी चलनाचे महत्त्व कमी होईल आणि लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं, चांदी आणि तांब्याकडे मोठ्या प्रमाणात वळतील. त्यामुळेच हे मौल्यवान धातू सर्वसामान्यांसाठी आर्थिक सुरक्षिततेचे साधन ठरतील, असे त्यांनी सांगितले होते.

गेल्या काही महिन्यांत ही भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता, तर चांदीने प्रति किलो 4 लाख रुपयांचा टप्पा पार केला.

गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 70 टक्क्यांची वाढ झाली असून, चांदीने तब्बल 160 टक्क्यांहून अधिक परतावा दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल बँक ठेवींऐवजी मौल्यवान धातूकडे वळताना दिसत आहे.

मात्र, 30 जानेवारीनंतर परिस्थिती अचानक बदलली. सलग तीन दिवस सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी आधी खरेदी केलेले आभासी सोने-चांदी विकण्याचा निर्णय घेतला,

तर काहींनी घसरलेल्या दराचा फायदा घेत नव्याने गुंतवणूक केली. याच काळात डॉलरमध्येही कमजोरी दिसून आली, ज्यामुळे जागतिक आर्थिक अस्थिरतेची भीती अधिक वाढली.

एकूणच, बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये आर्थिक संकटाची चाहूल लागल्याचे संकेत सध्याच्या बाजारातून मिळत आहेत. दर वाढले किंवा घटले तरी, सोने आणि चांदी हेच भविष्यात सुरक्षित गुंतवणुकीचे प्रमुख पर्याय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News