फेब्रुवारी 2026 मध्ये ऑटो बाजारात मोठी उलथापालथ; SUV-MPV चाहत्यांसाठी नवे पर्याय, कारखरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Published on -

Indian Car Market : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फेब्रुवारी 2026 पर्यंत थोडा संयम ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण या महिन्यात भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे.

बजेट सेगमेंटपासून ते प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटपर्यंत अनेक नामांकित वाहन उत्पादक आपली नवी SUV आणि MPV मॉडेल्स लाँच करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांसमोर पर्यायांची रेलचेल असणार आहे.

यामध्ये सर्वात आधी चर्चा होत आहे निसान ग्रेवाइट (Nissan Gravite) या नव्या MPV ची. ही कॉम्पॅक्ट 3-रो MPV Renault Triber च्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे.

आकर्षक डिझाइन, अधिक आधुनिक फीचर्स असलेला केबिन आणि पेट्रोल इंजिनसोबत मॅन्युअल व AMT गिअरबॉक्सचा पर्याय या गाडीत मिळण्याची शक्यता आहे. किफायतशीर दरात कुटुंबासाठी आरामदायी कार शोधणाऱ्यांसाठी निसान ग्रेवाइट एक उत्तम पर्याय ठरू शकते.

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये BMW X3 30 xDrive M Sport Pro ही गाडी 16 फेब्रुवारी 2026 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या टॉप व्हेरिएंटमध्ये 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

यामुळे दमदार पॉवरसोबत स्मूथ आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे. लक्झरी आणि परफॉर्मन्सचा उत्तम समतोल साधणाऱ्या ग्राहकांसाठी ही SUV आकर्षक ठरेल.

दरम्यान, MG Majestor ही Gloster चे अधिक प्रीमियम आणि अपडेटेड व्हर्जन मानली जात आहे. ही SUV 12 फेब्रुवारीला लॉन्च होणार असून लक्झरी, पॉवर आणि रोड प्रेझेन्सवर भर देण्यात आला आहे.

दुसरीकडे, Maruti Suzuki e Vitara ही कंपनीची पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असून, एका चार्जवर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देण्याचा दावा आहे. विशेष म्हणजे या गाडीला सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, Volkswagen Tayron ही मोठी 7-सीटर SUV Toyota Fortuner आणि Skoda Kodiaq सारख्या गाड्यांना थेट टक्कर देणार आहे. 45 ते 50 लाख रुपयांच्या संभाव्य किमतीत येणारी ही कंपनीची फ्लॅगशिप SUV ठरणार आहे.

एकूणच, फेब्रुवारी 2026 हा महिना कार खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. इलेक्ट्रिक SUV, फॅमिली MPV किंवा लक्झरी कार–प्रत्येक सेगमेंटमध्ये नवे, आधुनिक आणि आकर्षक पर्याय उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News