मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसानचा 22 वा हप्ता मिळणार ! काही शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये, वाचा…

Published on -

Pm Kisan Yojana : पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्हाला पण पीएम किसानचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

पीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेच्या पैशांचे वाटप केले जाते.

या योजनेतून आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण 21 हप्ते मिळाले आहेत. दरम्यान आता याच्या पुढील 22 व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान च्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळू शकतो. तरीही अद्याप शासनाने या योजनेच्या पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

शासन या योजनेचा हप्ता वितरित करण्याआधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर हप्त्याची तारीख जाहीर करत असते.

22 वा हप्ता वितरित करण्याआधी देखील शासन अधिकृत संकेतस्थळावर तारीख जाहीर करणार आहे. यामुळे या योजनेचा पुढील 22 वा हप्ता नेमका कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

खरंतर पुढील महिन्यात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे आणि हाच सण शेतकऱ्यांना आनंदात साजरा करता यावा ही गोष्ट विचारात घेऊन शासनाच्या माध्यमातून होळी सणाच्या आधी या योजनेचा 22 वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

यामुळे कदाचित यावेळी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 22 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये वर्ग होतील असा दावा होतोय. नक्कीच होळीच्या आधी लाडक्या शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले तर त्यांचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

पी एम किसान योजना देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरली आहे. शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी योजनेची मोठी मदत होत आहे.

अशातच या योजनेच्या काही शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याच्या वेळी 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार अशी बातमी सध्या प्रसार माध्यमांमध्ये फिरू लागली आहे.

कोणाला मिळणार चार हजार रुपयांचा लाभ?

मीडिया रिपोर्टनुसार तांत्रिक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांना पात्र असूनही मागील 21 वा हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व शेतकऱ्यांना 22 वा हप्ता वितरित करताना 21वा आणि 22 वा अशा दोन्ही हप्त्यांचा लाभ सोबतच दिला जाऊ शकतो.

म्हणजेच मागील हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी दोन हप्त्यांचे चार हजार रुपये सोबतच दिले जाऊ शकतात.

कागदपत्रांच्या त्रुटीमुळे तसेच केवायसी प्रक्रियेमुळे जर मागचा हफ्ता अडकला असेल आणि अशा शेतकऱ्यांनी जर त्रुटी दूर केली असेल तर त्यांना मागील दोन हजार रुपये सुद्धा या हफ्त्यासोबत दिले जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News