मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय ! ‘या’ मार्गांवर चालवणार नवीन रेल्वेगाडी

Published on -

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाचे अपडेट आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने नव्या एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा केली आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी आणि फेब्रुवारी महिन्यातील वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

या स्थानकावरून एकूण २४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. या विशेष गाड्या विविध तारखांना धावणार असून त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आज आपण मध्य रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्या बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक कसे राहणार तसेच या गाड्या कुठे कुठे थांबणार याची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.

कस असणार विशेष गाड्यांचे वेळापत्रक 

मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, सीएसएमटी ते कोल्हापूर, सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी ते नागपूर आणि पुणे ते नागपूर या दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कोल्हापूर दरम्यान ६ विशेष गाड्या धावतील. ट्रेन क्रमांक 01029 आणि 01030 या गाड्या १३, १८ आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित आहेत. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली आणि मिरज येथे थांबतील. 01029 ही गाडी CSMT वरून दुपारी २.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२० वाजता कोल्हापूरला पोहोचेल, तर 01030 ही गाडी कोल्हापूरवरून दुपारी ३.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता मुंबईत येईल.

सीएसएमटी ते सावंतवाडी रोड मार्गावरही ६ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. 01129 आणि 01130 या गाड्या १४, १९ आणि २१ फेब्रुवारीला धावतील. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आदी स्थानकांवर या गाड्यांना थांबा असेल.

मुंबई (CSMT) ते नागपूर दरम्यान २ सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. 02139 ही गाडी १९ फेब्रुवारीला मुंबईहून सुटेल, तर 02140 ही गाडी १७ फेब्रुवारीला नागपूरहून सुटणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते नागपूर दरम्यान ४ विशेष गाड्या (01021/01022) धावतील.

याशिवाय पुणे-नागपूर दरम्यान ६ सुपरफास्ट विशेष गाड्या (01467/01468 आणि 01419/01420) चालवण्यात येणार आहेत. पुणे, दौंड, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, अकोला आणि वर्धा मार्गे या गाड्या धावतील.

या सर्व गाड्यांचे आरक्षण IRCTC संकेतस्थळावर आणि पीआरएस केंद्रांवर सुरू झाले आहे. अनारक्षित तिकिटांसाठी यूटीएस अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. सविस्तर वेळापत्रकासाठी NTES अ‍ॅप किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News