Numerology Secrets : भारतात असंख्य पवित्र आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. श्रद्धा, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम असलेल्या या देवस्थानांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात.
ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा त्याच्या स्वभाव, प्रवृत्ती आणि आयुष्यावर विशेष प्रभाव असतो. त्यामुळे जन्मतारखेच्या मूलांकानुसार एखाद्या विशिष्ट मंदिराला भेट दिल्यास आध्यात्मिक शक्ती वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मानले जाते.

अंकशास्त्रात जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.
मूलांक 1 (सूर्य): 1, 10, 19, 28 या तारखांना जन्मलेले लोक धैर्यवान आणि नेतृत्वगुण असलेले असतात. सूर्य हा या अंकाचा स्वामी आहे. हिमाचल प्रदेशातील चामुंडा देवी मंदिराचे दर्शन त्यांच्यासाठी शुभ मानले जाते. येथे दर्शन घेतल्याने आत्मविश्वास वाढतो.
मूलांक 2 (चंद्र): 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्यांसाठी रामेश्वरम मंदिर अनुकूल आहे. चंद्र मनःशांतीचे प्रतीक असल्याने या मंदिराच्या दर्शनाने मानसिक स्थैर्य मिळते.
मूलांक 3 (गुरु): 3, 12, 21, 30 या तारखांना जन्मलेल्यांनी सोमनाथ मंदिराला भेट द्यावी. गुरु ज्ञान आणि अध्यात्माचे प्रतीक असून या दर्शनाने आध्यात्मिक शक्ती वृद्धिंगत होते.
मूलांक 4 (राहू): 4, 13, 22, 31 जन्मतारीख असणाऱ्यांसाठी तिरुमला बालाजी मंदिर शुभ आहे. राहूचा प्रभाव संतुलित करण्यासाठी हे दर्शन लाभदायक ठरते.
मूलांक 5 (बुध): 5, 14, 23 या तारखांना जन्मलेल्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घ्यावे. बुध बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य वाढवतो.
मूलांक 6 (शुक्र): 6, 15, 24 जन्मतारीख असलेल्यांसाठी आसाममधील कामाख्या देवी मंदिर शक्ती आणि सौभाग्य देते.
मूलांक 7 (केतू): 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्यांनी उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर गाठावे. हे दर्शन आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त आहे.
मूलांक 8 (शनी): 8, 17, 26 जन्मतारीख असणाऱ्यांसाठी भीमाशंकर ज्योतिर्लिंग लाभदायक ठरते.
मूलांक 9 (मंगळ): 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घ्यावे. मंगळ ऊर्जा आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.
अंकशास्त्रानुसार आपल्या मूलांकानुसार योग्य मंदिराला भेट दिल्यास सकारात्मक ऊर्जा, मनःशांती आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.













