नगर-मनमाड’महामार्गाबाबतचा तो संदेश होतोय व्हायरल…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था मागील महिनाभरापासून चर्चेत आहे. त्यातल्या त्यात नगर ते राहुरी रस्ता व त्यातील खड्डे दुचाकी व चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना जीवघेणे ठरत आहेत.

अनेकांचे अपघात या रस्त्यांवर झाले आहेत व त्यात काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मध्यंतरी या रस्त्याने नेहमी प्रवास करावा लागणारांनी रस्ता दुरुस्त झाला नाही तर आगामी निवडणुकांतून मतदानच न करण्याची भूमिका जाहीर केली होती. पण तिचाही प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर फारसा परिणाम झाला नाही.

रस्त्याची दयनीय स्थिती तशीच असल्याने अखेर या रस्त्याने प्रवास करणारांनी सोशल मिडियातून कोणाचेही नाव न घेता या रस्त्य़ाच्या दुरवस्थेची टर उडवली आहे. सोशल मिडियात नुकतीच यासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, ”अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी खुशखबर! डिस्कव्हरी चॅनलवरील प्रसिद्ध कार्यक्रम

“मॅन व्हर्सेस वाईल्ड”मधील जगप्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रील्स हे नगर जिल्ह्यातील व जगातील सर्वात भयानक आणि खडतर रस्ता म्हणजे “नगर ते मनमाड” पार करण्याचे आव्हान स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण डिस्कवरी चॅनलवर दाखवण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी हा कार्यक्रम पाहण्याचा सुवर्ण लाभ घ्यावा व आपल्या आसपास जर कोणी असेल तर त्यालाही बघायला सांगा..”.अशा आशयाची ही पोस्ट व्हायरल होत असल्याने ती वाचणारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू फुलत आहे. पावसाळा संपून आता जवळपास महिना होत आला असला

तरी रस्त्यांच्या दुरवस्था दूर होण्याला अजून मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोशल मिडियातून या रस्त्यांच्या दुरवस्थेची खिल्ली उडवली जात आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर मॅन व्हर्सेस वाईल्ड हा जगप्रसिद्ध शो करणारा कलावंत नगर-मनमाड रस्ता पार करून दाखवणार आहे व त्याचे लाईव्ह प्रक्षेपण डिस्कव्हरीवर दाखवले जाणार आहे,

अशा आशयाचे मेसेज व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत व त्यांना स्माईलींच्या रुपाने जोरदार लाईक्सही मिळत आहेत. उपरोधिक स्वरुपातील या मिश्किल टिपणीने राज्य़ातील महाविकास आघाडीच्या सत्तेच्या व त्यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या लोकाभिमुख कारभारावर प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment