वाडिया पार्कमधील बॅडमिंटन हॉल आजपासून होणार सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-क्रीडा संकुलातील खेळांची मैदाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील. ही मैदाने गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. अनेक मैदानांची साफसफाई, सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

खेळाडूंनी सर्व अटी-शर्ती व शासनाच्या नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांनी केले. तसेच वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलवर आजपासून पुन्हा खेळाडू दिसू लागतील. तिरंदाजी आणि जलतरणालाही प्रशासनाने परवानगी दिली आहे.

तलावाची स्वच्छता झाल्यानंतर नगरकर पोहण्याचा आनंद घेऊ शकतील, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांनी सोमवारी दिली. बॅडमिंटन मॉर्निंग ग्रूपच्या सदस्यांनी हॉल सुरू करण्यासंदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी पाटील यांची भेट घेतली. मंगळवारपासून हाॅल उपलब्ध करण्यात येणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी खेळाडूंसमवेत बॅडमिंटन हॉलमध्ये जाऊन हॉलच्या स्वच्छतेची समक्ष पाहणी केली. बऱ्याच महिन्यांनंतर हॉल खेळाडूंसाठी उपलब्ध होणार असल्याने बॅडमिंटनपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच स्टेडिअमच्या आतील मैदानावरील गवत साफ केल्यानंतर क्रिकेट खेळता येईल.

दिवाळीनंतर शासनाकडून आदेश आल्यानंतर नगरकरांचा माॅर्निंग आणि इव्हनिंग वाॅक पूर्ववत सुरू होऊ शकेल. अशी माहिती पाटील यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment