अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव भागात येसगाव शिवारात कोल्हेवस्ती परिसरात राहणारी विवाहित तरुणी निकिता गोविंद भोसले, (वय -१९ वर्ष) हिने मला बरे वाटत नाही,
असे म्हणून घरी जावुन घराशेजारी शौचालयामध्ये स्वत:च्या साडीने टॉयलेटच्या लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली.

याप्रकरणी मयत निकिता हिचा पती गोविंद आप्पा भोसले, (रा. कोल्हेवस्ती, येसगाव शिवार) या तरुणाने कोपरगाव तालुका पोलिसात वरीलप्रमाणे खबर दिल्यावरुन
आकस्मित मृत्यू नोंदविण्यात आला असून डिवायएसपी सातव, पोनि कटके यांनी घटनास्थळी भेट दिली. हेका आंधळे हे पुढील तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved