अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- नगर शहरात निधीअभावी अनेक कामे सुरू होत नाहीत, जी कामे झाली त्यांची बिले मिळत नाही, हा जुना पाढा अजूनही सुरूच आहे.
मनपाच्या ठेकेदार संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामांचे थकीत ४ कोटी इलेक्ट्रिकचे, तर जिल्हास्तर कामांचे दीड कोटी थकीत मिळावेत, या मागणीसाठी थेट आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. तक्रारदाराने म्हंटले आहे कि, नगर शहरात २०१६-२०१७ मध्ये केलेल्या कामांची पाहणी करून तत्कालीन कंत्राटी अभियंत्यांनी बिले तयार केली.
परंतु, या बिलांच्या फायली पुढे अकाउंट विभागाला पाठवल्याच नाही. जिल्हास्तरच्या कामांची बिले दोन वर्षांपासून रखडली आहेत.तथापि, मनपाने ही बिलेदेखील थकवली आहेत. थकबाकी मिळावी या मागणीसाठी आम्ही आंदोलन केले. त्यावर आयुक्तांनी एक समिती स्थापन करून कामांची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केल्याचे शेख यांनी सांगितले.
त्वरित बिल देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात ठेकेदार संघटनेचे शोएब शेख, रवी चव्हाण, राजू औटी, संतोष बुरा, अश्विन गडाख, राहुल फुलसाैंदर, सचिन गाडे, नंदकिशोर घाडगे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved