जिओ , एअरटेल, वोडाफोन-आयडियाचे ‘हे’ प्लॅन ; ‘ह्या’ दिवाळीत घ्या थेट पुढच्या दिवाळीत रिचार्ज करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-जर आपण असा डेटा प्लॅन शोधत असाल जो तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा ताण दूर करेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे.

येथे आम्ही रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्या वर्षभराच्या वैधता असणाऱ्या योजनेंबद्दल सांगणार आहोत. म्हणजेच या दिवाळीत आपण या योजना घेतल्या तर पुढील रिचार्ज 2021 च्या दिवाळीमध्ये करावा लागेल. पुढील दिवाळी 4 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.

1. जिओचा वर्षभराचा प्लॅन:-  रिलायन्स जिओच्या एका वर्ष व्हॅलिडिटीच्या अनेक योजना आहेत. यातील सर्वात स्वस्त योजना 2121 रुपयांची आहे. या योजनेची वैधता 336 दिवस आहे. या योजनेत दररोज 1.5 जीबी डेटा, 100 एसएमएस दररोज, जिओ ते जिओ अमर्यादित कॉलिंग, इतर नेटवर्कसाठी 12000 मिनिटे आणि जिओ अॅप्स सबस्क्रिप्शनची ऑफर देण्यात आली आहे.

 जिओचे अन्य लॉन्ग व्हॅलिडिटी प्लॅन  

प्लॅन                 व्हॅलिडिटी  डाटा मिनट
2399 रुपये 365 दिवस  730GB 12000
2599 रुपये         365 दिवस  730GB 12000
4999 रुपये          360 दिवस  350GB 12000

2. एअरटेलची वर्षभर चालणारी योजना:- वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या एअरटेलच्याही अनेक योजना आहेत. यातील सर्वात स्वस्त योजना म्हणजे 1498 रुपये. या योजनेची वैधता 365 दिवस आहे. या योजनेत 24GB डेटा, 3600 एसएमएस, सर्व नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग उपलब्ध आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्युझिक सबस्क्रिप्शनसह FASTagसाठी 150 रुपयांचा कॅशबॅक मिळतो.

– एयरटेलचे अन्य लॉन्ग व्हॅलिडिटी प्लॅन  

प्लॅन                 व्हॅलिडिटी डाटा
2498 रुपये        365 दिवस  730GB
2698 रुपये        365 दिवस  730GB

 

3. व्होडाफोन-आयडियाची वर्षभराचा प्लॅन :-व्होडाफोन-आयडिया किंवा व्हीआय मध्ये वर्षाच्या वैधतेसह 3 योजना आहेत. यातील सर्वात स्वस्त योजना म्हणजे 1499 रुपये. या प्लानची वैधता 365 दिवस आहे. या योजनेत 24 जीबी डेटा, 600 एसएमएस, सर्व नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग उपलब्ध आहे. यात Vi चित्रपट आणि टीव्ही सब्सक्रिप्शन, एमपीएलसाठी 125 रुपये बोनस आणि झोमाटोसाठी डेली फ्लॅट 75 रुपये डिस्काउंट मिळतो.

 वीआई अन्य लॉन्ग व्हॅलिडिटी प्लॅन

प्लान              व्हॅलिडिटी डाटा
2399 रुपये       365 दिवस   547GB
2595 रुपये       365 दिवस   730GB

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment